नवी दिल्ली : खाद्यपदार्थ आणि विशेषत: भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये १.२६ टक्के असा तेरा महिन्यांच्या उच्चांकी नोंदवला गेला, असे मंगळवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर सलग दोन महिन्यांपासून वाढता राहिलेला आहे. फेब्रुवारीमध्ये तो ०.२० टक्के आणि मार्चमध्ये ०.५३ टक्के होता. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ०.७९ टक्के नोंदवला होता.

घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर २०२३ सालात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नकारात्मक पातळीवर होती आणि नोव्हेंबरमध्ये प्रथमच तो शून्याच्या वर ०.२६ टक्क्यांसह सकारात्मक पातळीवर आला. नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत आता मार्चमध्ये हा दर जवळपास दुप्पट झाला आहे. आता पुन्हा त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> Stock Market Update : महागाई नरमल्याने निर्देशांकांना बळ; सेन्सेक्सची तीन शतकी चाल

खाद्यपदार्थ, वीज, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थांचे उत्पादन, इतर उत्पादन इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई दर आधीच्या महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढतो आहे. अन्नधान्याच्या किमतवाढीचा दर एप्रिलमध्ये वाढून ७.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो वर्षापूर्वी याच महिन्यात ६.८८ टक्क्यांवर होता. इंधन आणि ऊर्जा महागाई दर एप्रिलमध्ये १.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो मार्च महिन्यात उणे ०.७७ टक्के राहिला होता. भाजीपाल्यातील महागाई दर सर्वाधिक २३.६० टक्के होता. जो त्या आधीच्या मार्च महिन्यात १९.५२ टक्के नोंदण्यात आला होता. कांद्याच्या दरात ५९.७५ टक्क्यांनी वाढ झाली. त्याआधीच्या महिन्यात त्यातील महागाई दर ५६.९९ राहिला होता. बटाट्याची महागाई मार्चमधील ५२.९६ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ७१.९७ टक्क्यांवर पोहोचली.

हेही वाचा >>> एप्रिलमध्ये वाहनांची विक्रमी विक्री

गेल्या काही महिन्यांत बऱ्याच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली आहे, ज्यात एप्रिलमध्ये खनिज तेलाच्या किमतींचा समावेश आहे. आत्तापर्यंत कमॉडिटीच्या किमतींमध्ये जे पाहिले आहे त्याप्रमाणे, घाऊक महागाई दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांमध्ये म्हणजेच मे आणि जून महिन्यात तो २ टक्क्यांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, असे आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाले. आयसीआरएने विद्यमान आर्थिक वर्षात सरासरी घाऊक महागाई दर ३.३ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. एप्रिलमधील घाऊक महागाई दरातील वाढ ही किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या विपरीत आहे. चलनविषयक धोरण तयार करताना रिझर्व्ह बँक प्रामुख्याने किरकोळ चलनवाढ लक्षात घेत असते. एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ११ महिन्यांच्या नीचांकी ४.८३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात सलग सातव्यांदा रेपोदर अपरिवर्तित ठेवला आणि अन्न महागाईच्या वाढत्या जोखमींबाबत जागरुक असल्याचे सांगितले. आता रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर निर्धारण समितीची पुढील बैठक ५ ते ७ जून दरम्यान पार पडणार आहे.

Story img Loader