पीटीआय, नवी दिल्ली
घाऊक महागाईचा दर सरलेल्या सप्टेंबर महिन्यात उणे ०.२६ टक्का नोंदविण्यात आला. खाद्यवस्तूंच्या विशेषत: भाजीपाल्याच्या किमतीत घट झाल्याने सलग सहाव्या महिन्यात हा दर शून्याखाली अर्थात उणे स्थितीत राहिला असल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.
घाऊक किंमत निर्देशांकआधारित महागाईचा दर आधीच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये उणे ०.५२ टक्के होता. एप्रिलपासून सलगपणे हा दर शून्याच्या खाली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हा दर १०.५५ टक्के पातळीवर होता. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, खाद्यवस्तूंच्या किमतीत घट होत असल्याने, घाऊक महागाईचा दर मागील वर्षीच्या तुलनेत आणि महिनागणिकदेखील घसरता राहिला आहे.
हेही वाचा… प्रवासी वाहनांच्या विक्रीचा उच्चांक, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १० लाख ७४ हजार विक्री
खाद्यवस्तूंच्या महागाईचा दर सप्टेंबरमध्ये कमी होऊन ३.३५ टक्क्यांवर आला. त्याआधीच्या दोन महिन्यांत तो दोन अंकी पातळीवर होता. ऑगस्ट महिन्यात हा दर १०.६० टक्के होता. भाज्यांच्या महागाईचा दर सरलेल्या सप्टेंबरमध्ये उणे १५ टक्के नोंदवला गेला. ऑगस्टमध्ये हा दर ४८.३९ टक्के होता. बटाट्याचा महागाईचा दर ऑगस्टमध्ये उणे २४.०२ टक्के होता. सप्टेंबर महिन्यात तो उणे २५.२४ टक्क्यांवर आला. इंधन व ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा दर उणे ३.३५ टक्के आणि उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर उणे १.२४ टक्के आहे.
हेही वाचा… फिनोलेक्स केबल्सप्रकरणी आदेशाला ‘एनसीएलएटी’कडून फेरविचारानंतर स्थगिती
डाळी, कांदा, दूध, फळे महाग
खाद्यवस्तूंच्या महागाईत सप्टेंबर महिन्यात घट नोंदविण्यात आली असली तरी डाळी, कांदे, दूध आणि फळांच्या महागाईत वाढ नोंदविण्यात आली आहे. डाळींच्या महागाईचा दर १७.६९ टक्के असून, कांद्याच्या महागाईचा दर ५५.०५ टक्के आहे.