इन्फोसिस आज देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. तिची स्थापना १९८१ मध्ये एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या अभियंत्यांनी केली होती. कंपनीत लाखो कर्मचारी आजमितीस काम करतात. इन्फोसिस १९९९ मध्ये यूएस शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाली होती आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय कंपनी होती. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील नारायण मूर्ती यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १० हजार रुपये घेऊन या कंपनीचा पाया रचला होता. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची सुरुवात कशी केली याचा एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. नारायण मूर्ती यांनी १९ ऑगस्ट १९७६ रोजी पत्नी सुधा मूर्ती यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांना नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगितले. सुधा मूर्ती हसल्या आणि म्हणाल्या, काहीच अडचण नाही, आपल्याकडे जे काही उपजीविकेचं साधन असेल ते घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करू.
इन्फोसिसची सुरुवात कशी झाली?
सुधा मूर्ती यांच्या मते, पती नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसची सुरुवात केली. यादरम्यान ते मुंबईतील वांद्रे येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. नारायण मूर्ती सांगतात की, त्यांची पत्नी सुधा मूर्ती ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक अडचणीत ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली. इन्फोसिससाठी त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडे १०,००० रुपयांचे कर्ज मागितले. एका मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी सांगितले की, त्यांना पतीने पैसे देण्यास कसे मनवले. त्यांनी दहा हजार रुपये पतीच्या हातात ठेवल्याचेही सांगितले. हे पैसे सुधा मूर्ती यांनी पतीच्या नकळत एका टिनच्या पेटीत जमा केले होते. यातील २५० रुपये आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडावेत म्हणून लपवून ठेवले होते.
हेही वाचाः कौतुकास्पद! मुकेश अंबानी २०२९ पर्यंत कोणताही पगार घेणार नाहीत, पण का?
लाखो कर्मचारी काम करतात
सध्या इन्फोसिसमध्ये ३,१४,००० हून अधिक कर्मचारी काम करतात. नारायण मूर्ती यांच्याबरोबरच नंदन निलेकणी, एनएस राघवन, एस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोरा हे इन्फोसिसचे सह-संस्थापक होते. हे सर्व लोक पटनी कॉम्प्युटरमध्ये एकत्र काम करायचे. या लोकांनी मर्यादित साधनांच्या जोरावर देशातील सर्वात यशस्वी आयटी कंपनी इन्फोसिसचा पाया घातला.
हेही वाचा: डीएबाबत आनंदाची बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच वाढण्याची शक्यता
१ ऑगस्ट २०१४ रोजी कंपनीने विशाल सिक्का यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्यांदाच कंपनीची धुरा बाहेरच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात वाद निर्माण झाला आणि तीन वर्षांनी ते पायउतार झाले.