इन्फोसिस आज देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. तिची स्थापना १९८१ मध्ये एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या अभियंत्यांनी केली होती. कंपनीत लाखो कर्मचारी आजमितीस काम करतात. इन्फोसिस १९९९ मध्ये यूएस शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाली होती आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय कंपनी होती. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील नारायण मूर्ती यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १० हजार रुपये घेऊन या कंपनीचा पाया रचला होता. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची सुरुवात कशी केली याचा एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. नारायण मूर्ती यांनी १९ ऑगस्ट १९७६ रोजी पत्नी सुधा मूर्ती यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांना नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगितले. सुधा मूर्ती हसल्या आणि म्हणाल्या, काहीच अडचण नाही, आपल्याकडे जे काही उपजीविकेचं साधन असेल ते घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा