अदाणी समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेस ही अदाणी विल्मर या समूहातीलच कंपनीतील आपला हिस्सा कमी करणार आहे. अदाणी समूहाने विल्मर इंटरनॅशनलबरोबर हा ग्राहक संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. आता अदाणी एंटरप्रायझेसला या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी करायची आहे, जेणेकरून ती आपल्या मूळ व्यवसायाचे भांडवल वाढवू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून गौतम अदाणी हे त्यांच्या अदाणी समूहाची कंपनी असलेल्या अदाणी विल्मरमधील ४४ टक्के शेअर्स विकण्याचा विचार करीत आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार, अदाणी विल्मरमधील समूहाचे बाजारमूल्य सुमारे २७० दशलक्ष डॉलर आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे अदाणी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समूह अशा बातम्यांना प्रतिसाद देत नाही. तसेच विल्मरच्या प्रतिनिधीने यावर बोलण्यास नकार दिला आहे.

अदाणी विल्मरने गेल्या वर्षी २०२२ मध्ये IPO द्वारे ३६०० कोटी रुपये उभे केले होते. या IPO अंतर्गत गुंतवणूकदारांना २३० रुपयांना शेअर्स जारी करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांना २१ रुपयांची सूट मिळाली. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांमुळे त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. नंतर त्यांनी रिकव्हरी दर्शविली आणि सध्या त्याचे शेअर्स ३९३.०५ रुपयांवर आहेत. ही BSE वर ८ ऑगस्ट २०२३ ची बंद किंमत होती. गेल्या वर्षी २३ सप्टेंबर २०२२ रोजी तो ८४१.९० रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर होता.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचाः भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, चीनने अमेरिकेला टाकले मागे, जपान-रशिया कोणत्या स्थानी?

अदाणी विल्मर ही फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) क्षेत्रातील कंपनी आहे. हे खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यांसारख्या स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंची विक्री करतात. ही कंपनी १९९९ मध्ये स्थापन झाली.

हेही वाचा: Money Mantra : तुम्हालाही सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक चिंता सतावत आहे का? ‘या’ ५ प्रकारे नियोजन करा

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, १०,००० हून अधिक वितरकांच्या माध्यमातून ११.४ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचले आहे. त्याच्या व्यावसायिक स्पर्धकाबद्दल सांगायचे झाल्यास त्याला आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरने स्पर्धा केली आहे. जून तिमाहीत कंपनीला ७९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, खाद्यतेलाच्या किमतीत घसरण आणि मालाची वाढती किंमत यामुळे हा तोटा वाढला आहे.

Story img Loader