अदाणी समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेस ही अदाणी विल्मर या समूहातीलच कंपनीतील आपला हिस्सा कमी करणार आहे. अदाणी समूहाने विल्मर इंटरनॅशनलबरोबर हा ग्राहक संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. आता अदाणी एंटरप्रायझेसला या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी करायची आहे, जेणेकरून ती आपल्या मूळ व्यवसायाचे भांडवल वाढवू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून गौतम अदाणी हे त्यांच्या अदाणी समूहाची कंपनी असलेल्या अदाणी विल्मरमधील ४४ टक्के शेअर्स विकण्याचा विचार करीत आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार, अदाणी विल्मरमधील समूहाचे बाजारमूल्य सुमारे २७० दशलक्ष डॉलर आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे अदाणी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समूह अशा बातम्यांना प्रतिसाद देत नाही. तसेच विल्मरच्या प्रतिनिधीने यावर बोलण्यास नकार दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा