लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक मंगळवारपासून सुरू झाली. ही बैठक तीन दिवस चालणार असून, त्यात व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ न होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. या बैठकी तीन निर्णयांची घोषणा गुरुवारी (१० ऑगस्ट) केली जाणार आहे. मागील वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ सुरू केली होती. रेपो दर फेब्रुवारी महिन्यात ६.५ टक्क्यांवर पोहोचले. त्यानंतर मात्र एप्रिल व जूनमधील पतधोरण समितीच्या सलग दोन बैठकांत रेपो दरात बदल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा – Gold-Silver Price on 9 August 2023: सोने खरेदी करणाऱ्यांची लागली लाॅटरी, किमतीत चमत्कारिक घसरण, १० ग्रॅमचा दर ऐकून लोकांच्या उड्या

भाव खाल्लेला टॉमेटो नडणार?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महागाईतील वाढ चिंताजनक आहे. असे असले तरी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाणार नाही. व्याजदर स्थिर ठेवून अर्थचक्राची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचबरोबर इतरही भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. मात्र आधीही असे प्रकार घडले त्या वेळी व्याजदरात बदल झालेला नव्हता.

हेही वाचा – क्रेडिट कार्ड थकीत देणी ४ हजार कोटींवर

महागाईवर रिझर्व्ह बँकेचे बारकाईने लक्ष आहे. भाज्यांसह आवश्यक खाद्यान्नांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जागतिक पातळीवरील अनिश्चितता पाहता बँकेकडून सावध पवित्रा घेतला जाईल आणि व्याजदर स्थिर ठेवले जातील. – ध्रुव अगरवाल, प्रमुख, हाऊसिंग डॉट कॉम

Story img Loader