तुमचेही SBI मध्ये खाते आहे का? जर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. खरं तर काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये जर तुम्ही तुमचे खाते पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे खाते ब्लॉक केले जाणार आहे, असा दावा केला जतोय. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी या मेसेजचे सत्य जाणून घ्या. या प्रकरणाची माहिती देताना पीआयबी फॅक्ट चेकने अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेसेजचे सत्य काय आहे?

या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे की, गेल्या काही दिवसांपासून फसवणूक करणारे स्टेट बँकेच्या नावाने लोकांना मेसेज पाठवत आहेत की, जर तुम्ही तुमच्या खात्यात पॅन क्रमांक अपडेट केला नाही तर मग तुमचे खाते ब्लॉक केले जाईल. याबरोबरच तुम्हाला कॉल किंवा कोणत्याही लिंकद्वारे पॅन माहिती अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. असा काही मेसेज आला तर चुकूनही विश्वास ठेवू नका. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे.

अशा फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवा

स्टेट बँक आपल्या ग्राहकांना नेहमी सावध करीत असते. बँक कोणालाही कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती अपडेट करण्याचा सल्ला देत नाही. बँक पॅन तपशील अपडेट करण्यास सांगणारी कोणतीही लिंक पाठवत नाही. याबरोबरच बँकेने असेही सांगितले आहे की, जर कोणी सायबर गुन्ह्याचा बळी ठरला तर अशा परिस्थितीत तो सायबर क्राईम सेलमध्ये १९३० या क्रमांकावर किंवा report.phishing@sbi.co.in या ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sbi account be closed if pan card is not linked what is the whole matter vrd