देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने व्होल्टास कंपनी विकणार असल्याच्या वृत्ताचे पूर्णपणे खंडन केले आहे. टाटा समूहाची गृह उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्होल्टास ही मोठी कंपनी विकली जाणार असल्याचा मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला गेला होता. या ७० वर्ष जुन्या कंपनीच्या विक्रीच्या वृत्ताचे खंडन करत कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, अशा रिपोर्टमुळे व्होल्टासचे भागधारक आणि गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

‘या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही’

व्होल्टास लिमिटेडने मंगळवारी सांगितले की, अशा बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यात तथ्य नाही. अशा बातम्यांमुळे केवळ चिंताच नाही तर पेचही निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाने अशी कोणतीही कल्पना स्पष्टपणे नाकारलेली आहे. ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात कंपनीची विक्री करण्याच्या तयारीची माहिती दिली होती. यावर व्होल्टास म्हणाले की, हे रिपोर्ट खोटे आहेत आणि आवश्यक स्पष्टीकरण जारी करण्यासाठी संबंधित साइट्सला नोटीसही बजावली आहे.

kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
thermax collaborates with ceres power for green hydrogen production
थरमॅक्सच्या ‘सेरेस’शी भागीदारी; पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती देशात शक्य
BMC Clerk Recruitment 2024: Last Day to Apply for 1,846 Vacancies
BMC Clerk Recruitment 2024: मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार
Disposal of two and a half lakh metric tons of waste by Vasai Municipal corporation
कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
Dharavi Redevelopment Project Pvt Ltd ground breaking ceremony of Dharavi redevelopment cancelled Mumbai news
अखेर धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द; स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डीआरपीपीएलची माघार
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर

हेही वाचाः अनेक अपमान सहन करूनही डगमगला नाही आत्मविश्वास; मेहनतीच्या जोरावर आज १ लाख कोटींच्या फंड हाऊसच्या सीईओ

कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर शेअर्स वाढले

व्होल्टास लिमिटेडची विक्री करण्याच्या तयारीच्या वृत्तामुळे कंपनीच्या शेअर्सवर (Volras Share) परिणाम होण्याची शक्यता होती, परंतु या प्रकरणी त्वरित निवेदन जारी करून व्होल्टास व्यवस्थापनाने गुंतवणूकदार आणि भागधारकांची चिंता कमी करण्याचे काम केले आहे. बुधवारी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान दुपारी १२ वाजता व्होल्टासचे शेअर १.०१ टक्क्यांच्या वाढीसह ८२२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. २७२२ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या या कंपनीचे शेअर्स सकाळी ९.१५ वाजता ८२०.२५ रुपयांवर उघडले. मंगळवारी कंपनीचे समभाग १.७० टक्क्यांनी घसरले आणि ८१३.८० रुपयांवर बंद झाले.

हेही वाचाः विप्रो कर्मचाऱ्यांनो वर्क फ्रॉम होम विसरा, आता आठवड्यातून ३ दिवस कार्यालयात यावे लागणार, हायब्रीड वर्क पॉलिसी लागू

ही कंपनी १९५४ मध्ये सुरू झाली

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टाटा समूहाने १९५४ मध्ये व्होल्टास कंपनी सुरू केली. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनी मुख्यत्वे एअर कंडिशनर्स, वॉटर कूलर, एअर कूलर, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, डिशवॉशर्स, मायक्रोवेव्ह, एअर प्युरिफायर आणि होम अप्लायन्सेसशी संबंधित व्यवसाय करते. कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कंपनीत १६८९ कर्मचारी काम करतात.

त्याच्या उत्पादनांना जगभरात मागणी

व्होल्टास कंपनीचा भारत, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत व्यवसाय आहे. टाटा समूह आपल्या संयुक्त उपक्रम Arcelik AS सह भारतात व्होल्टास व्यवसाय करीत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत रेफ्रिजरेटर्ससाठी व्होल्टासचा भारतातील बाजारातील हिस्सा ३.३ टक्के आणि वॉशिंग मशीनसाठी ५.४ टक्के होता. व्होल्टासने नुकतेच तिचे Q२ निकाल जाहीर केले आणि ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ३६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे सांगितले.

विक्रीचे हे कारण अहवालात देण्यात आले

ब्लूमबर्गच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, स्पर्धात्मक बाजारपेठेत व्यवसायाचा विस्तार करण्याच्या आव्हानांमुळे टाटा समूह व्होल्टास लिमिटेडचा व्यवसाय विकण्याचा विचार करीत आहे. मात्र, ही चर्चा केवळ सुरुवातीच्या टप्प्यात असून, टाटा समूहाने या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यानंतर टाटा समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार कंपनीची विक्री करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सांगितलं आहे.