मुंबई : देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर रिझर्व्ह बँकेने नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि नवीन पत व्यवहारांवर गेल्या बुधवारी निर्बंध घातले. परिणामी त्याचे प्रतिकूल परिणाम ‘पेटीएम’च्या समभागावर उमटत असून शुक्रवारच्या सत्रात समभागात पुन्हा २० टक्क्यांची घसरण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा समभाग २० टक्क्यांनी म्हणजेच १२१.७५ रुपयांच्या घसरणीसह ४८७.०५ रुपयांवर बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी समभाग लोअर सर्किट मर्यादेपर्यंत खाली घसरला. परिणामी सलग दोन सत्रात कंपनीचे बाजार भांडवल १७,३७८.४१ कोटींनी घसरून ३०,९३१.५९ कोटी रुपयांपर्यंत खाली ओसरले.

हेही वाचा – आदिवासींचे आरक्षण संपवण्याचा घाट! ‘पवित्र पोर्टल’वरील शिक्षक भरतीत शून्य आरक्षण, १००० जागांमध्ये एकही जागा नाही

पेटीएमने भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे कंपनीच्या वार्षिक कार्यान्वयन नफ्यावर ३०० ते ५०० कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भविष्यात कंपनीची वाटचाल नफा कमाविण्याच्या दिशेने सुरू राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये ४९ टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा – नकली नोटा छापण्याच्या ३ मशीन, ४१ लाखांच्या २ महागड्या कार अन् १९ लाख कॅश जप्त, जग्गू डॉन आहे तरी कोण? जाणून घ्या…

पेटीएम ॲप २९ फेब्रुवारीनंतरही कार्यरत राहणार

पेटीएम डिजिटल पेमेंट आणि सेवा ॲप कार्यरत २९ फेब्रुवारीनंतरही नेहमीप्रमाणे कार्यरत राहील, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी शुक्रवारी समाजमाध्यमाद्वारे दिली. कंपनी संपूर्णपणे देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असून प्रत्येक पेटीमरसाठी, तुमचे आवडते ॲप कार्यरत आहे, असे शर्मा म्हणाले. रिझर्व्ह बँकेने येत्या २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यास प्रतिबंध केला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the paytm app continue what did the company say about the paytm app paytm stock fell print eco news ssb