Windfall Tax on Crude Oil: भारत सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल कर कमी करून ६७०० रुपये प्रति टन केला आहे. पूर्वी तो ७१०० रुपये प्रति टन होता. याशिवाय डिझेलवरील निर्यात शुल्क ५.५० रुपये प्रति लिटरवरून ६ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. याशिवाय एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) म्हणजेच जेट इंधनावरील निर्यात शुल्क २ रुपये प्रति लिटरवरून ४ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. नवीन कर दर २ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचा काय परिणाम होणार?

सरकार दर १५ दिवसांनी विंडफॉल टॅक्सचा आढावा घेते. कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्यामुळे १ जुलै २०२२ रोजी सरकारने तेल कंपन्यांवर पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स लागू केला होता. निर्यात केलेल्या पेट्रोल आणि डिझेलसह एटीएफ आणि देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर तो लादला जातो. देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ओएनजीसी यांसारख्या कच्च्या तेल उत्पादक कंपन्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या पेट्रोल-डिझेल निर्यात करणार्‍या कंपन्यांवर याचा परिणाम होतो.

हेही वाचाः देशातील पाचवी सर्वात श्रीमंत महिला, त्यांच्याकडे २८ हजार कोटींची संपत्ती, कोण आहेत लीना तिवारी?

सरकारने पहिल्यांदा किती विंडफॉल कर लावला?

गेल्या वर्षी १ जुलै रोजी सरकारने पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स लागू केला होता. त्यावेळी निर्यात केलेल्या पेट्रोल आणि एटीएफवर प्रतिलिटर ६ रुपये आणि डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते.

हेही वाचाः आतापर्यंत २ हजार रुपयांच्या ९३ टक्के नोटा बँकांकडे परत, तुम्हीसुद्धा जमा केल्या आहेत ना?

कच्च्या तेलाची किंमत

कच्चे तेल प्रति बॅरल ८८ डॉलरच्या आसपास आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात सातत्याने कपात केल्यामुळे किमतीत वाढ होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Windfall tax cut on crude oil know what will be its effect vrd