नवी दिल्ली: डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल कर वाढवून प्रति लिटर दीड रुपया, तर देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त करात देखील वाढ केली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसीसारख्या कंपन्यांद्वारे उत्पादित खनिज तेलावरील कर त्यामुळे आता ३,२०० रुपये प्रति टनांवरून ३,३०० रुपये प्रति टनांवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 15 February 2024: मुंबई-पुण्यात आजचा सोन्याचा भाव किती आहे?

सरकारने डिझेलच्या निर्यातीवरील कर वाढवून दीड रुपया रुपया प्रति लिटर केला. याआधी तो शून्यावर नेण्यात आला होता. तर पेट्रोल आणि विमान इंधन अर्थात एटीएफ निर्यातीवरील कर शून्यावर कायम आहे. फेरआढाव्याअंती निश्चित केलेले नवीन दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत. केंद्र सरकारकडून दर पंधरवड्याला तेलाच्या जागतिक पातळीवरील किमतींचा अंदाज घेऊन त्या संबंधाने ‘विंडफॉल करा’चा फेरआढावा घेण्यात येतो.

१ जुलै २०२२ पासून विंडफॉल कर लागू करण्यात आला होता. अस्थिर भू-राजकीय परिस्थिती आणि खनिज तेलातील चढ-उतरांमुळे विंडफॉल कराची वसुली किती काळ चालू राहील हे सांगणे कठीण असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Windfall tax increase on diesel and mineral oil print eco news zws
Show comments