केंद्रातील मोदी सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल कर १२,१०० रुपये प्रति टन केला आहे. तसेच डिझेलवरील निर्यात शुल्क ५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे, जे पूर्वी ५.५० रुपये प्रति लिटर होते. याशिवाय जेट इंधनावरील निर्यात शुल्क २.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे, जे पूर्वी ३.५ रुपये प्रति लिटर होते. पेट्रोलवरील निर्यात शुल्क सध्या शून्य आहे.

हेही वाचाः ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

३० सप्टेंबरपासून नवीन दर लागू

सरकारने जाहीर केलेले विंडफॉल टॅक्सचे नवे दर ३० सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. विंडफॉल टॅक्सच्या दराचा १५ दिवसांनी सरकारकडून आढावा घेतला जातो. विंडफॉल टॅक्स प्रचलित बाजारभावाच्या आधारे लावला जातो. यापूर्वी १५ सप्टेंबर रोजी विंडफॉल टॅक्सचे नवीन दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील कर ६७०० रुपये प्रति टनावरून १०,००० रुपये प्रति टन करण्यात आला होता. डिझेलवरील निर्यात शुल्क ६ रुपये प्रति लिटरवरून ५.५० रुपये प्रति लीटर करण्यात आले. याशिवाय एटीएफवरील निर्यात शुल्क ६ रुपयांवरून ५.५० रुपये प्रति टन करण्यात आले.

हेही वाचाः Money Mantra : कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार अन् जोखीमही शून्य; व्यवसाय करायचा असल्यास ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स कधी लावला गेला

गेल्या वर्षी १ जुलै रोजी सरकारने पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स लागू केला होता. त्यावेळी निर्यात केलेल्या पेट्रोल आणि एटीएफवर प्रतिलिटर ६ रुपये आणि डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९४ डॉलरच्या आसपास आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात सातत्याने कपात केल्यामुळे किमतीत वाढ होताना दिसत आहे.

Story img Loader