देशातील चौथी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात यावे लागणार असल्याची माहिती देणारा ईमेल पाठवला आहे. कंपनीने याला हायब्रिड वर्क पॉलिसी असे नाव दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिमोट वर्क पॉलिसी कंपन्या बदलतायत

कोविड १९ महामारीमुळे रिमोट वर्क पॉलिसी लागू करण्यात आली. आता अनेक कंपन्या यामध्ये बदल करत असून, कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावले जात आहे. गेल्या आठवड्यात भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसनेही कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून १० दिवस कार्यालयातून काम करण्याचे धोरण लागू केले. दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करणे सुरू केले आहे.

हेही वाचाः Money Mantra : Linked FD आणि सामान्य मुदत ठेवीत फरक काय? अधिक परतावा कुठे मिळणार? जाणून घ्या

विप्रो मे महिन्यापासून प्रयत्न करतेय

मे महिन्यापासून विप्रो आपल्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयातून काम करावे यासाठी प्रयत्न करीत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांचे ५५ टक्के कर्मचारी अशा पद्धतीने ऑफिसमधून काम करीत आहेत. कंपनीत २.४४ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.

हेही वाचाः एकेकाळी ४७ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन होते, आता जगातील सर्वात मोठी कंपनी दिवाळखोरीत

कार्यालयात न आल्यास कारवाई केली जाणार

या मेलद्वारे कंपनीने इशारा दिला आहे की, जे कर्मचारी हा नियम पाळणार नाहीत त्यांच्या विरोधात ७ जानेवारीपासून कारवाई सुरू होणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र कर्मचारी न परतल्याने अनेक टीम्सच्या मनोबलावर परिणाम होईल, असे मानले जात आहे. कार्यालयात येणारे कर्मचारीही असमाधानी असू शकतात. त्यामुळे कंपनीला आपल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.

युरोपीय देशांतील कर्मचाऱ्यांशी बोलणे आवश्यक

अनेक युरोपीय देशांमध्ये वेगवेगळ्या नियमांमुळे कंपनीला असा निर्णय लागू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. या संदर्भात कंपनीने सांगितले की, आम्ही सर्व कायद्यांचे पालन करून पुढे जाऊ. कर्मचाऱ्यांमध्ये टीमवर्कची भावना वाढवायची आहे आणि ते एकत्र काम करू शकतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wipro employees forget work from home now have to come to office 3 days a week hybrid work policy is in effect vrd
Show comments