मुंबईः बहुतांश उद्योजकांना बँका कर्ज मिळविताना आव्हानांचा सामना करावा लागतो. शिवाय कर्ज वसुली किंवा कायदेशीर वादांमध्ये संघर्ष करावा लागल्याने त्यांच्या व्यवसायात अडचणी निर्माण होतात.
उद्योजकांच्या या समस्या लक्षात घेऊन मनीलाईफ फाऊंडेशनतर्फे शुक्रवार, ७ मार्चला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान वालचंद हिराचंद सभागृह, इंडियन मर्चंट चेंबर्स इमारत, चर्चगेट येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस बँकिंग आणि कॉर्पोरेट कायद्याचा दशकांचा अनुभव असलेले कायदेतज्ज्ञ आणि उद्योजक अॅड. मनोज हरित हे मार्गदर्शन करणार आहेत.
उद्योजकांना व्यावसायिक चुका टाळण्यास आणि कायदेशीर अडचणीतून सुटकेस मदतकारक मार्ग ते सुचवतील. संपूर्ण निःशुल्क कार्यशाळेत सहभागासाठी https://www.moneylife.in/events/MSMEs_732025/index.html वर नाव नोंदणी करता येईल. सामान्य कायदेशीर आणि आर्थिक अडचणी, लघुउद्योगांनी बँका व देणेकऱ्यांशी असणाऱ्या वादांना कसे तोंड द्यावे, उद्योजकांचे हक्क, कायदेशीर सुरक्षेचे उपाय समजून घेण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल.