भारतातील २०२३ च्या पुरुषांच्या ODI विश्वचषकाने स्टेडियममधील उपस्थिती आणि प्रसारण दर्शकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०१५ च्या विश्वचषकादरम्यान १,०१६,४२० प्रेक्षकांच्या मागील विक्रमाला मागे टाकून भारतातील मैदानांवर एकूण १,२५०,३०७ प्रेक्षकांनी ४८ सामने पाहिले, असे आयसीसीने म्हटले आहे. इंग्लंडमधील २०१९ विश्वचषक ७,५२,००० प्रेक्षकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः Ashneer Grover Case : भारतपेने दाखल केली नवी केस, अश्नीर ग्रोव्हरला मागावी लागली माफी
डिस्ने स्टारने सांगितले की, भारतातील लीनियर टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्या अर्ध्या अब्जाहून अधिक झाली असून, स्पर्धेच्या सहा आठवड्यांमध्ये वर्ल्ड कपसाठी ५१८ चाहत्यांनी स्पर्धेतील सामन्यांचा आनंद लुटला . भारतातील ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) च्या आकडेवारीनुसार ४२२ अब्ज मिनिटं इतका कालावधी प्रेक्षकांनी वर्ल्डकपचे सामने पाहिले आहेत, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वचषक बनला आहे. भारत ऑस्ट्रेलिया सामना ३०० दशलक्ष चाहत्यांनी पाहिला.
सामन्यादरम्यान एकाक्षणी १३० दशलक्ष चाहते अंतिम लढत पाहत होते. सर्वाधिक कॉन्करंटचा विक्रमही मोडीत निघाला. टीव्हीवर सर्वाधिक पाहिला गेलेला क्रिकेट सामना असं डिस्ने स्टारने भारत-ऑस्ट्रेलिया लढतीच्या प्रेक्षकसंख्येबाबत म्हटलं आहे. डिस्ने हॉटस्टार अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मवरही वर्ल्डकपने नवे विक्रम प्रस्थापित केले. हॉटस्टारवर ५९ दशलक्ष चाहत्यांनी वर्ल्डकप पाहणं पसंत केलं.