Economy of egg in india, World Egg Day 2023 : जगातील कोणत्याही देशात गेलात तरी तुम्हाला अंडी आणि त्यापासून बनवलेले पदार्थ नक्कीच खायला मिळतील, अगदी मांसाहारी नसलेल्या लोकांनाही अंडी खायला आवडतात. सध्या वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. महागाईचा परिणाम हा अंड्यांवरही झाला आहे. जागतिक अंडा दिवसानिमित्त भारतासह इतर देशातील अंड्यांचे उत्पादन अन् किमतींचा आढावा घेणार आहोत.

खरं तर भारतात अंड्यांचं उत्पादन हे सर्वाधिक होते. भारतातील १० राज्ये अंड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास व्यवसाय मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात वर्ष २०२१-२२ मध्ये १२९.६० बिलियन नग अंड्यांचं उत्पादन झालं आहे. मंत्रालयाच्या मूलभूत पशुसंवर्धन आकडेवारी २०२२ नुसार (Basic Animal Husbandry Statistics), गेल्या वर्षीच्या तुलनेत अंड्याच्या उत्पादनात ६.१९ टक्के वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकासह भारतातील १० राज्यांत अंड्यांचं उत्पादन सर्वाधिक होते. देशातील अंडा उत्पादनात आंध्र प्रदेशचं योगदान २०.४१ टक्के आहे. तसेच २०२१-२२ च्या आकड्यांनुसार, देशातील एकूण अंडा उत्पादनात तामिळनाडूचा वाटा १६. ०८ टक्के आहे. तेलंगणातही अंड्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. इथे वार्षिक १२.८६ टक्के उत्पादन होते.

infrastructure growth slips in august
पायाभूत क्षेत्रांच्या वाढीला घरघर; साडेतीन वर्षात पहिल्यांदाच नकारात्मक; ऑगस्टमध्ये उणे १.८ टक्क्यांपर्यंत अधोगती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Benefits of PPF Investment in 2024
‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!
healthy liver: 1-3 of 10 Indians have liver disease, says health ministry; here’s how to ensure you’re safe
Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या
flood situation alarming in north bengal centre not extending help says cm mamata banerjee
प. बंगालमधील पूरस्थिती चिंताजनक; केंद्र सरकार मदत करत नसल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
Koradi Power Generation Project, Koradi,
वीज निर्मिती प्रकल्पावरून सरकार व पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपणार, ‘हे’ आहे कारण
stock market, investing in stock market,
बाजार रंग : शास्त्र असतं ते! ‘थ्रिल’ नाही…
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…

भारतात सर्वात स्वस्त अंडी उपलब्ध

आंतरराष्ट्रीय अंडी आयोगा(International Egg Commission)नुसार, जगातील ६० टक्के अंडी चीन, युरोप, अमेरिका आणि भारतात उत्पादित केली जातात. आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ नुसार, १२५० कोटी वार्षिक क्षमतेसह जागतिक अंडी उत्पादनात भारत आता तिसर्‍या क्रमांकावर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, भारतात डझनभर अंड्यांची किंमत ०.९५ डॉलर म्हणजे ७८ रुपये आहे. त्यानुसार येथे एका अंड्याची सरासरी किंमत साडेसहा रुपये आहे.

हिवाळ्यात अंड्यांचा घरगुती वापर जास्त होतो

भारतात दरवर्षी सरासरी ९१ अंडी प्रति व्यक्ती वापरली जातात. पण हिवाळ्यात त्याचा वापर वाढतो. देशांतर्गत बाजारापेक्षा जागतिक बाजारपेठेत अंड्यांचे भाव जास्त असले तरी त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

हेही वाचाः मुकेश अंबानींनी कुटुंबीयांसह बद्रीनाथ मंदिराला दिली भेट, बीकेटीसीला ५ कोटी केले दान

महाराष्ट्रात दररोज १ कोटी अंड्यांचा तुटवडा

महाराष्ट्र दररोज २.२५ कोटींहून अधिक अंडी वापरतो आणि दररोज १ कोटी अंड्यांचा तुटवडा आहे.

हेही वाचाः गंगाजलावरील जीएसटीबाबत सीबीआयसीकडून स्पष्टीकरण, म्हणाले, ”पूजा साहित्यावर…”

पाकिस्तानातही अंडी महाग

या क्रमवारीत भारतानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो. आपल्या शेजारच्या देशात डझनभर अंड्यांची किंमत १.०१ डॉलर म्हणजे 83 रुपये आहे. त्यानुसार येथे एक अंडे सुमारे सात रुपयांना मिळते. त्याचप्रमाणे इराण, बांगलादेश, रशिया, इंडोनेशिया येथील अंड्यांचे दरही अधिक आहेत.

स्वित्झर्लंडमध्ये अंड्याचे दर सर्वाधिक वाढले

स्वित्झर्लंडमध्ये अंडी सर्वात महाग आहेत. येथे एक डझन अंड्याची किंमत ६.६९ डॉलर म्हणजेच ५५० रुपये आहे. त्यानुसार येथे एका अंड्याची किंमत ४६ रुपये आहे.

‘या’ देशातही अंडी महाग आहेत

यानंतर आइसलँड, न्यूझीलंड, अमेरिका, डेन्मार्क, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, नॉर्वे, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया या क्रमवारीत येतात. यूकेमध्ये डझनभर अंड्यांची किंमत २.८१ डॉलर आहे. तर डझनभर अंडी चीनमध्ये १.८१ डॉलर, जपानमध्ये १.८१ डॉलर, इराणमध्ये १.१८ डॉलर आणि रशियामध्ये १.१५ डॉलरमध्ये उपलब्ध आहेत.