Best Startup Companies in 2024 देशात स्टार्टअप्स कंपन्या वेगाने प्रगती करीत आहेत; पण या वेगाने विकसित होणाऱ्या स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये टिकून राहणे ही आव्हानात्मक बाब आहे. तसेच यातही १ बिलियन डॉलर्सपर्यंत (१०० कोटी) पोहोचणे ही त्याहून प्रतिष्ठेची बाब आहे. कारण- त्यातून केवळ स्टार्टअप कंपनीचे आर्थिक यशच दिसत नाही, तर स्टार्टअपचा बाजारातील प्रभाव अन् एक चांगले नेतृत्व दिसून येते. या वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये २०२४ अनेक युनिकॉर्न स्टार्टअप्स कंपन्या सुरू झाल्या, ज्यांनी वर्षभरात अनेकविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले आणि बाजारपेठेला एक आकार दिला. इतकेच नाही, तर जागतिक बाजारपेठेतही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यामुळे २०२४ हे वर्ष भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी उल्लेखनीय वर्ष ठरले आहे, ज्यामध्ये सहा स्टार्टअप कंपन्यांनी १ बिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. इलेक्ट्रिक वाहनांपासून ते एआय, फिनटेक व राइड-हेलिंगपर्यंत या स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाल्या आहेत.

2024 मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झालेल्या भारतीय स्टार्टअप्स कंपन्या

१) अथर एनर्जी

नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (NIIF)मधून ६०० कोटी रुपये उभारल्यानंतर बंगळुरूस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर मेकर अथर एनर्जी ही स्टार्टअप कंपनी ऑगस्ट २०२४ मध्ये युनिकॉर्न क्बलमध्ये सामील झाली. फंडिंग राउंडमध्ये कंपनीचे मूल्य १.३ बिलियन डॉलर इतके होते. तरुण मेहता आणि स्वप्नील जैन यांनी २०१३ मध्ये या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली, पण, आजच्या घडीला Ather Energy ही कंपनी भारतातील EV क्षेत्रात आघाडीवर आहे.

News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
municipal corporation issued notices to 5000 establishments with unauthorized constructions in Chikhli Kudalwadi
पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील पाच हजार लघुउद्योजकांना नोटीस; उद्योजकांचा एमआयडीसी बंद करण्याचा इशारा
Reliance Jio Republic Day Offer 2025
Republic Day Offer 2025 : अशी भन्नाट ऑफर शोधून सापडणार नाही! फक्त एकदा करा रिचार्ज आणि मिळवा भरपूर कूपन
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
pratyusha vemuri success story who built ai based cyber security firm crores company after fraud
फसवणूक झाल्यानंतर सुचली कल्पना अन् उभारली कोटींची कंपनी; शार्क टॅंककडून मिळाली मोठी डील, वाचा नेमका कोणता व्यवसाय करते ही व्यक्ती
Image Of Milky Mist Products
Milky Mist IPO : पनीरपासून आईस्क्रीमपर्यंत अशा विविध पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी आणणार २ हजार कोटींचा आयपीओ
Akash Joshi Ankur Pathak
Success Story: ‘दोन मित्र चांगले व्यावसायिकही होऊ शकतात…’ छोट्या खोलीतून सुरू झालेला व्यवसाय आता करोडोंच्या घरात पोहोचला

२) क्रुट्रिम

जानेवारी २०२४ मध्ये भाविश अग्रवाल यांनी स्थापन केलेली क्रुट्रिम ही स्टार्टअप कंपनी या वर्षी भारतातील पहिली एआय युनिकॉर्न बनली आहे. Z47 च्या नेतृत्वाखालील फंडिंग राउंडमध्ये या स्टार्टअपने ५० मिलियन डॉलर्स जमा केले. कंपनीने स्थापनेच्या एका वर्षातच १ मिलियन डॉलर्सपर्यंत मजल मारली. Crutrim लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLM) विकसित करण्यात आघाडीवर आहे आणि सामान्य संगणकीय व एज ऍप्लिकेशन्ससाठी भारतातील पहिल्या स्वदेशी AI चिप्स तयार करण्यावर काम करीत आहे. OpenAI आणि Google सारख्या जागतिक दिग्गज कंपन्यांशी, तसेच SarvAI सारख्या देशांतर्गत कंपन्यांशी स्पर्धा करीत Crutrim भारताच्या उदयोन्मुख एआय इकोसिस्टीममध्ये आघाडीवर आहे.

३) मनीव्ह्यू

लॅण्डिंग टेक स्टार्टअप मनीव्ह्यूने सप्टेंबर २०२४ मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला. एक्सेल इंडिया आणि नेक्सस व्हेंचर्सकडून मिळालेल्या १.२ मिलियन डॉलर्सवर कंपनीने ४.६ मिलियन डॉलर्सची कमाई केली. पुनित अग्रवाल आणि संजय अग्रवाल यांनी २०१४ मध्ये स्थापन केलेली मनीव्ह्यू ही स्टार्टअप कंपनी पर्सनल लोन, फायनॅन्शियल मॅनेजमेंट व क्रेडिट ट्रॅकिंग सेवा देते.

४) परफियोस

मार्च २०२४ मध्ये फिनटेक परफियोस कंपनीने टीचर्स व्हेंचर ग्रोथ (TVG)मधून ८० मिलियन डॉलर्स उभे केले आणि त्याचे मूल्य आता १ बिलियनपेक्षा जास्त आहे. या स्टार्चअपची स्थापना २००८ मध्ये व्ही. आर. गोविंदराजन आणि देबाशीष चक्रवर्ती यांनी केली होती. ही स्टार्टअप कंपनी सध्या १८ देशांमधील एक हजारपेक्षा जास्त वित्तीय संस्थांसाठी डेटा कलेक्शन आणि विश्लेषण उपाय देते.

५) रॅपिडो

राईड-हेलिंग स्टार्टअप रॅपिडो जुलै २०२४ मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली आणि वेस्टब्रिज कॅपिटलमधून १२० मिलियन डॉलर्स जमा केले. आता कंपनी १ बिलियनपेक्षा जास्त कमाई केली. ऋषिकेश एस. आर., पवन गुंटुपल्ली व अरविंद सांका यांनी २०१५ मध्ये या कंपनीची स्थापन केलेली रॅपिडो बाइक टॅक्सी, ऑटो ट्रान्स्पोर्टेशन आणि कॅब सेग्मेंटमध्ये काम करते.

६) रेटगेन

२०२४ मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश करणारी एकमेव लिस्टेड कंपनी म्हणजे रेटगेन. SaaS सोल्युशन्स प्रदान करते. भानू चोप्रा यांनी २००४ मध्ये या कंपनीची स्थापना केली, जी ट्रॅव्हल अॅण्ड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी काम करते. जवळपास १०० देशांमध्ये ३२०० पेक्षा जास्त ग्राहकांना ही कंपनी सेवा देते.

Story img Loader