Best Startup Companies in 2024 : देशात स्टार्टअप्स कंपन्या वेगाने प्रगती करीत आहेत; पण या वेगाने विकसित होणाऱ्या स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये टिकून राहणे ही आव्हानात्मक बाब आहे. तसेच यातही १ बिलियन डॉलर्सपर्यंत (१०० कोटी) पोहोचणे ही त्याहून प्रतिष्ठेची बाब आहे. कारण- त्यातून केवळ स्टार्टअप कंपनीचे आर्थिक यशच दिसत नाही, तर स्टार्टअपचा बाजारातील प्रभाव अन् एक चांगले नेतृत्व दिसून येते. या वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये २०२४ अनेक युनिकॉर्न स्टार्टअप्स कंपन्या सुरू झाल्या, ज्यांनी वर्षभरात अनेकविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले आणि बाजारपेठेला एक आकार दिला. इतकेच नाही, तर जागतिक बाजारपेठेतही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यामुळे २०२४ हे वर्ष भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी उल्लेखनीय वर्ष ठरले आहे, ज्यामध्ये सहा स्टार्टअप कंपन्यांनी १ बिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. इलेक्ट्रिक वाहनांपासून ते एआय, फिनटेक व राइड-हेलिंगपर्यंत या स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा