युट्यूब म्युझिक ४३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कर्मचाऱ्यांचा एक प्रतिनिधी यासंदर्भातील सुनावणीदरम्यान पगारवाढ व इतर सोयीसुविधांची मागणी करत असतानाच त्याच्या एका महिला सहकाऱ्याने त्या सर्वांना नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती त्याला दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूट्यूब म्युझिकमधील कर्मचारी कपातीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती गुगल आणि कॉग्निझंट यांनी संयुक्तपणे केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलने याबाबत काय म्हटलं आहे?

गुगलने सांगितलं की जे काही घडलं त्यासाठी आम्ही जबाबदार नाही. मात्र तुम्हा सगळ्यांना तातडीने कामावरुन कमी करण्यात येतं आहे. सोशल मीडियावर या संबंधीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

जॅक बेनेडिक्ट नावाचा कर्मचारी आपली आणि आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होता. त्याचवेळी त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला येऊन सांगितलं की तुझ्यासह आपल्या सगळ्यांची नोकरी गेली आहे. याचवेळी त्याचं म्हणणं जे ऐकत होते त्यांनी सांगितलं तुझी बोलण्याची वेळ संपली आहे. या घटनेनंतर जॅक बेनडिक्टला काय बोलावं ते काही क्षणांसाठी सुचलंच नाही. मात्र त्याला आलेला राग त्याच्या चेहऱ्यावरुन लपत नव्हता. वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त दिलं आहे. आम्हाला कुठलीही पूर्वसूचना दिल्याशिवाय थेट कामावरुन काढण्यात आलं आहे. तसंच अधिक कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे मागण्या करु नये यासाठी एक अहवाल तयार करण्यात आला. जॅक बेनेडिक्ट त्याच्यासह इतर कर्मचाऱ्यांची मागणी कौन्सिलपुढे करत होता. त्याचवेळी त्याच्यासह सगळ्यांना तातडीने कामावरुन काढण्यात आल्याचे आदेश देण्यात आले.

या कर्मचाऱ्यांसह नेमकं काय घडलं?

गुगल आणि कॉग्निझंटने या कर्मचाऱ्यांसह जो करार केला होता त्याची मुदत संपली. त्यामुळे टाळेबंदीचं कारण दाखवत या सगळ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. हे सगळे YouTube म्युझिकचे कर्मचारी होते. मात्र ते अल्फाबेट वर्कर्स युनियनचे सदस्य होते. आता गुगलने या सगळ्या प्रकरणातून अंग काढून घेतलं आहे. ज्यानंतर अल्फाबेट वर्कर्स युनियनने हा आरोप केला आहे की जी टाळेबंदी दाखवण्यात आली ती काही तास आधी करण्यात आली होती आणि कुठलीही पूर्व कल्पना न देता या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. टेक्सासच्या ऑस्टिन या ठिकाणी घडलेली ही घटना आहे. या ठिकाणी असलेल्या युट्यूब म्युझिकच्या ४३ कर्मचाऱ्यांना पगार वाढवण्याची मागणी केल्याने तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे.

दरम्यान गुगलच्या प्रवक्त्याने या घडामोडीनंतर हा जॅकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर द व्हर्जला एक ईमेल पाठवला आहे. त्यात त्याने असं म्हटलं आहे की आमचे कंत्राटी कर्मचाऱ्यांसह असलेले करार विशिष्ट तारखांना संपतात. आम्ही जर त्या कर्मचाऱ्यांचे करार पुढे सुरु ठेवले नाही तर ते संपले असंच गृहीत धरलं जातं. आम्ही जी टाळेबंदी केली तो आमच्या व्यवसायाचा भाग आहे. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे त्यांना नवी नोकरी शोधण्यासाठी सात आठवड्यांचा पगारी वेळ आम्ही दिला आहे असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.