नवी दिल्ली : झी मीडिया कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय ओझा यांची ४ मेपासून पदावरून हटविण्यात आल्याची माहिती कंपनीने भांडवली बाजाराला सोमवारी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक झाली. ओझा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदमुक्त करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ४ मेपासून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ओझा यांना पदावरून का हटविण्यात आले, याबद्दल कंपनीने मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विकासदर २०२५ मध्ये ७.१ टक्क्यांवर! इंडिया रेटिंग्जच्या सुधारीत अंदाजात ६० आधारबिंदूंनी वाढ  

तथापि कंपनीतील सूत्रांच्या हवाल्यानुसार, खुद्द झीचे संस्थापक सुभाष चंद्र गोयल यांच्याकडून आलेल्या फर्मानावरून निर्माण झालेल्या मतभेदातून ओझा यांनी राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक प्रचार-सभा व मिरवणुकांंवर प्रसिद्धी दिली जाऊ नये, असा गोयल यांचा आदेश जुमानणे पसंत केले नसल्याची त्यांनी अशी किमत मोजावी लागल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.   गेल्या वर्षी ओझा यांना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बढती देण्यात आली होती. ते झी मीडियामध्ये २०२२ मध्ये मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून रूजू झाले होते. दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरूवातीला कंपनीचे मुख्य व्यवस्थापक (विधी) पियूष चौधरी यांनी राजीनामा दिला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee media corporation terminates ceo abhay ojha print eco news zws