Personal loan: तुम्हाला काही आर्थिक अडचण येत असल्यास किंवा जास्त पैशांची आवश्यता असल्यास तुम्ही इतर गोष्टींबरोबरच बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन (NBFC) कडून वैयक्तिक कर्ज काढू शकता. बँकांमध्ये सामान्यतः, वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याची आणि वितरित करण्याची एक व्यवस्थित प्रक्रिया असते. परंतु, आता तात्काळ वैयक्तिक कर्ज मिळण्याचे अनेक मार्ग आहेत. खरं तर अनेक वित्तीय संस्थांमध्ये कर्जदारांना त्वरित वैयक्तिक कर्ज देण्याची तरतूद आहे.

त्वरित वैयक्तिक कर्ज काढण्याचे दोन प्रकार:

  • क्रेडिट कार्डवर ऑफर

तुमची बँक तुम्हाला क्रेडिट कार्डवर त्वरित कर्ज देऊ शकते. हे झटपट कर्ज सहसा अनेक फायद्यांसह येते. तुम्हाला त्यासाठी कोणतेही दस्तऐवज सबमिट करण्याची आवश्यकता नाही आणि तुम्ही यासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकता. या त्वरित कर्जासाठी कोणतीही KYC प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. कारण, तुमच्या बँकेकडे आधीपासूनच तुमचा पॅन, आयडी पुरावा, बँक स्टेटमेंट आणि उत्पन्नाचा पुरावा यासह सर्व कागदपत्रे उपलब्ध असतात.

  • फिनटेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध

तात्काळ कर्ज काढण्यासाठी अनेक फिनटेक प्लॅटफॉर्मदेखील आहेत, जे कोणत्याही मोठ्या मानवी हस्तक्षेपाशिवाय कर्जदारांना त्वरित कर्ज देतात. ते तुम्हाला सिस्टीमवर सर्व प्रमुख कागदपत्रे फक्त अपलोड करण्यास सांगतात आणि आधार प्रमाणिकरणाद्वारे ते तुमची ओळख तपासू शकतात आणि कर्जाची रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात.

परंतु, ही गोष्ट जाणून घेणे गरजेचे आहे की, ही कर्जे कमी किमतीची आहेत आणि सामान्यत: डिजिटल लेंडिंग आउटलेट्सद्वारे ऑफर केली जातात. दरम्यान, बहुतेक व्यावसायिक बँका कर्जदारांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यापूर्वी सावधगिरी बाळगतात.

तुम्ही झटपट वैयक्तिक कर्जाची निवड करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक पावले उचलायला हवी.

तात्काळ वैयक्तिक कर्ज घेताना काय करावे आणि काय करू नये?

त्वरित कर्ज घेताना काय करावे?

  • ऋण देणाऱ्याची माहिती

तुम्ही एका प्रतिष्ठित कंपनीकडून त्वरित वैयक्तिक कर्ज घेतल्याची खात्री करा आणि पूर्णपणे अज्ञात वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याची चूक करू नका.

  • नोंदणीकृत NBFC

जर तुम्ही मोठ्या किंवा मध्यम व्यावसायिक बँकेकडून कर्ज घेत असाल, तर याची शिफारस केली जाते. परंतु, तुम्ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) निवडली असली तरीही ती नोंदणीकृत आहे का याची खात्री करा. तुम्ही RBI नोंदणीकृत NBFC ची यादी येथे पाहू शकता.

  • प्रक्रिया शुल्क

कर्ज घेण्यासाठी जास्त प्रक्रिया शुल्क असू नये. तात्काळ कर्जाच्या नावाखाली, तुमच्याकडून उच्च प्रक्रिया शुल्क स्वीकारू नये.

  • व्याज दर

व्याजाच्या दराची नियमित वैयक्तिक कर्जाच्या दराशी तुलना करून पाहा. व्याजदरातील थोडासा फरक तुम्हाला दीर्घकाळासाठी महागात पडू शकतो.

वैयक्तिक कर्ज घेताना या चुका करू नका

  • योग्य निर्णय घ्या

जेव्हाही तुमच्याकडे तुमची बँक आणि अज्ञात कर्जदार यांच्यातील एकाची निवड करायची असेल तेव्हा तुम्ही तुमच्या बँकेची निवड करावी. नवीन ऋणदाता कर्ज मंजुरीपूर्वी छुपे शुल्क आकारू शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचे ग्राहक समर्थन घृणास्पद असू शकते.

हेही वाचा: रद्द केलेला चेक म्हणजे काय? हा चेक जपून ठेवणे गरजेचे आहे का? घ्या जाणून…

  • क्रेडिट कार्डवर कर्ज

क्रेडिट कार्डवर कर्ज घेण्याचे अनेकांना नेहमीच आकर्षण असते. परंतु, यात इतर वैयक्तिक कर्जांपेक्षा त्याच्या व्याजावर लावण्यात आलेला जीएसटीदेखील पाहायला हवा. कारण, इतर व्यक्तिगत कर्जांवर हा कर लागत नाही, म्हणून क्रेडिट कार्डवर वैयक्तिक कर्ज स्वीकारण्यापूर्वी तुम्ही केलेली कोणतीही गणना हे लक्षात घेऊनच केली पाहिजे.

  • नोंदणीकृत नसलेल्या NBFC

नॉन-बँकिंग वित्तीय संस्था निवडण्यापूर्वी अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे. बँक किंवा नोंदणीकृत NBFC सोबत स्पष्ट भागीदारी नसलेल्या अस्पष्ट फिनटेक प्लॅटफॉर्मची निवड करणे योग्य नाही.