लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : शुभप्रसंगी सोने खरेदी करण्याची भारतीय परंपरा राहिली आहे. सणासुदीच्या हंगामात तर कुटुंबासह सोने खरेदीसाठी लोक बाहेर पडत असतात. गुंतवणूकदार म्हणून, सोने खरेदीदारांना सोन्याच्या विविध उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. जर खरेदीदाराला दागिन्यांची गरज नसेल तर उपलब्ध पर्याय किंवा उत्पादनांपैकी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून समोर आलेला पर्याय म्हणजे गोल्ड ईटीएफ.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Lack of measures for conservation protection of golden fox Mumbai print news
सोनेरी कोल्ह्याच्या संवर्धन, संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव

गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंडांच्या युनिट्सप्रमाणे शुद्ध सोन्यातील गुंतवणुकीचे युनिट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करतात आणि डिमॅट खात्यात साठवले जाते. भौतिक धातूंमध्ये गुंतवणूक करण्याइतकाच हा सरळ, सुरक्षित व सोपा पर्याय आहे. गोल्ड ईटीएफचे प्रत्येक युनिट अत्यंत उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या मूल्याइतकेच असते. इतर कोणत्याही ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड-ईटीएफ’प्रमाणे गोल्ड ईटीएफदेखील भांडवली बाजारात सूचीबद्ध आणि निरंतर खरेदी-विक्री व्यापारास खुले असते. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही समयी गोल्ड ईटीएफ सहज खरेदी आणि विक्री करू शकते. त्यामुळे, जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गोल्ड ईटीएफ हा एक उत्तम तरल पर्याय असू शकतो. पोर्टफोलिओतील वैविध्याच्या दृष्टिकोनातूनही गोल्ड ईटीएफ सर्वोत्तम ठरतो.

गोल्ड ईटीएफची वैशिष्ट्ये:

छोट्या रकमेची गुंतवणूक शक्य: गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये कमीत कमी ४५ रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात, जी आयसीआयसीआय प्रुडेंशियल गोल्ड ईटीएफच्या १ युनिटची (२० ऑक्टोबर २०२२ रोजी असलेली) किंमत आहे. त्यामुळे एखाद्या गुंतवणूकदाराला सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही जी बहुतेक वेळा भौतिक सोने खरेदी करताना आवश्यक ठरते.

परवडण्याजोगा पर्याय : भौतिक सोन्याची खरेदी, साठवणूक आणि विम्याच्या तुलनेत गुंतवणुकीची किंमत तुलनेने कमी आहे.

विश्वसनीयता : गोल्ड ईटीएफचे लक्ष्य हे ९९.५ टक्के किंवा त्याहून अधिक शुद्धतेचे सोने खरेदी करण्याचे आहे.

कमी खर्च : भौतिक सोने खरेदीच्या तुलनेत ईटीएफ गोल्डशी संबंधित खर्च खूपच कमी आहे. कारण त्यात कोणतेही घडणावळ शुल्क लागत नाही. उदाहरणार्थ, आयसीआयसीआय प्रुडेंशियल गोल्ड ईटीएफचे खर्चाचे प्रमाण ०.५ टक्के आहे जे उपलब्ध गोल्ड ईटीएफमध्ये सर्वात स्वस्त आहे.

तरलता : गोल्ड ईटीएफला कोणत्याही समयी एक्स्चेंजवर त्या त्या समयीच्या ‘एनएव्ही’वर व्यवहार सत्रादरम्यान आवश्यकतेनुसार एक युनिट इतक्या प्रमाणातही विकता येऊ शकते. परिणामी दागिने, नाणी किंवा बार विकण्यापेक्षा हे खूप सोपे आहे.

तारण म्हणून सुलभ : ईटीएफ हे कर्जाकरिता तारण स्वरूपात स्वीकारले जाते.

कर बचत : जर गोल्ड ईटीएफ युनिट्स तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बाळगून विकले असतील तर त्यातून मिळणारे उत्पन्न दीर्घकालीन भांडवली नफा समजले जाते. सोन्यातील गुंतवणुकीतून करबचतीचा हा प्रभावी मार्ग आहे.

विविधीकरण : एखाद्याच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी एक साधन म्हणून ते वापरले जाऊ शकते.

गुंतवणूकदाराने बाळगावयाची सावधगिरी :

भौतिक सोन्याच्या किमतींप्रमाणे ईटीएफच्या किमती वाढतात किंवा कमी होतात. म्हणूनच सोन्याच्या किमतीतून नफा मिळवण्यासाठी सोन्याचे ईटीएफ उत्तम साधन म्हणून वापरले जातात. म्हणजेच, गुंतवणूकदार प्रत्यक्ष मालमत्ता खरेदी न करता सोन्यात गुंतवणुकीचे फायदे घेऊ शकतात. ते विकून गुंतवणूकदाराला भौतिक सोन्याऐवजी रोख रक्कम मिळते. किंबहुना गोल्ड ईटीएफद्वारे, गुंतवणूकदाराला परवडणाऱ्या किमतीत आणि शक्य तितक्या सुरक्षित पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करता येते. शिवाय ईटीएफद्वारे गुंतवणूक करताना, एखाद्याच्या गरजेनुसार लहान लॉटमध्ये युनिट जमा करण्याची किंवा विकण्याची सुविधा आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना, गुंतवणूकदाराकडे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)द्वारे गुंतवणूक करण्याचा किंवा एकरकमी असे दोन्ही गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे खरेदीदाराला त्याची शुद्धता, स्टोरेज समस्या इत्यादींबद्दल काळजी करण्याची गरज पडत नाही.