अमेरिकेच्या चुकीमुळे येत्या एक ते दीड महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. म्हणजेच सोन्याच्या दरात चार ते पाच हजार रुपयांची वाढ दिसून येत आहे. खरे तर हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेच्या कर्ज थकबाकीशी संबंधित आहे. अमेरिकेने हा प्रश्न वेळीच सोडवला नाही, तर लाखो नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर अमेरिकेतही मंदी येऊ शकते आणि सोन्याच्या किमती गगनाला भिडू शकतात. दुसरीकडे पुढील फेड धोरणात अमेरिका एकतर व्याजदर कमी करू शकते किंवा स्थिर ठेवू शकते. विशेष म्हणजे भारतातही एमपीसी सलग दुसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. याबद्दल तज्ज्ञांचं मत काय ते जाणून घेऊयात.

…तर अमेरिकेला फार गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते

सध्या अमेरिकेवर कर्जफेडीची टांगती तलवार आहे. रविवारीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. कर्ज बुडवल्यास देशातील लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, असे प्रशासकाचे म्हणणे आहे. धोरण निर्माते, व्हाईट हाऊस आणि बँकर्स वारंवार म्हणतात की, अमेरिका डिफॉल्टच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशात मंदीची शक्यता वाढली आहे. १५ जूनपर्यंत देशाने हा प्रश्न सोडवला नाही, तर फार गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

सोन्याचा भाव गगनाला भिडण्याची शक्यता

आयआयएफएलचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, जर अमेरिकेने कर्ज चुकवले तर सोन्याचे भाव वाढतील. सोन्याचा भाव ६५ हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी सांगितले. कर्जफेड ही अमेरिकेसाठी मोठी समस्या आहे आणि असे झाल्यास मंदीच्या शक्यतांना बळ मिळेल आणि सोन्याच्या दरात वाढ होईल. जेव्हा आर्थिक संकट येते आणि तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयाच्या दिशेने जातात आणि सोन्यात गुंतवणूक करतात. एका महिन्यात सोन्याच्या दरात ५००० हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचाः अदाणी कंपन्यांची २०१६ पासून चौकशी सुरू होती हा तथ्यहीन आरोप; सेबीचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

फेड आणि आरबीआयची भूमिका काय?

तसेच दुसरी बाजू वेगळी आहे. जर अमेरिका कर्ज चुकवण्यापासून वाचली, तर सोन्याच्या किमतीवर अवलंबून राहणे हे जूनमध्ये होणाऱ्या फेड धोरणाच्या बैठकीपुरते मर्यादित असेल. कारण असा अंदाज आहे की, यावेळी फेड एकतर ०.१५ टक्के कपात करू शकते किंवा व्याजदर स्थिर ठेवू शकते. याशिवाय जून महिन्यात आरबीआयची धोरणात्मक बैठकही होणार असून, एमपीसी सलग दुसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवू शकते, असे सांगितले जात आहे. अशा स्थितीत सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून येते. पण ही फक्त एक शक्यता आहे, जी सध्या तरी अनिश्चित आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता अमेरिकेच्या कर्जबुडव्या स्थितीकडे लागल्या आहेत.

हेही वाचाः गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेने बचत खाते आणि एफडीवर व्याज वाढवले, ८.५० टक्क्यांपर्यंत मिळतोय लाभ

सध्याची सोन्याची किंमत स्थिर

परदेशी बाजारातून स्थानिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतीत फारशी हालचाल नाही. प्रथम परदेशी बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास कॉमेक्सवर गोल्ड फ्युचर्स २,०१९.२० डॉलरवर आहे आणि ६ डॉलरच्या किंचित वाढीसह सोन्याचा स्पॉट २,०१७.३१ डॉलर प्रति औंस आहे. तसेच चांदीचा वायदा २४.१८ डॉलरवर आणि चांदीचा स्पॉट २४.०६ डॉलर प्रति औंस आहे. दुसरीकडे भारतीय वायदा बाजार MCX वर सोने ४८ रुपयांच्या वाढीसह ६०,९३५ रुपयांवर व्यवहार करीत आहे. दुसरीकडे चांदी १६८ रुपयांच्या वाढीसह ७३,२२२ रुपयांवर व्यवहार करीत आहे.