Gold Price Increased Today : सणासुदीच्या तोंडावर देशात सोन्याचे भाव वधारले आहेत. देशात सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ७७ हजार रुपये इतका झाला आहे. सोन्यावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून घटवून ६ टक्के करण्यात आलेला असूनही सोन्याचा दर वाढतच आहे. आयात शुल्क कमी केलं नसतं तर आज सोन्याचा दर ८० हजारांच्या पुढे केला असता. देशांतर्गत बाजारासह सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर २,७२७.२० डॉलर/औन्स इतका आहे.

मध्य-पूर्व आशियातील तणाव, युद्ध आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे गेल्या ४५ वर्षांत सोन्याने सर्वाधिक परतावा दिला आहे. तर चांदीनेही उच्चांक गाठला असून चार वर्षांमधील सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा ३२.५ टक्के वाढ झाली आहे. १९७९ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.गेल्या साडेचार दशकांमधील म्हणजेच ४५ वर्षांमधील आकडेवारी पाहता २०२४ मध्ये सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी सोन्याच्या किंमतीत तब्बल ३२.५ टक्के वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष संपायला अद्याप दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात.

article about utpal sheth
बाजारातली माणसं : बाप से बेटा सवाई – उत्पल शेठ
pi industries company profile portfolio of pi industries limited
माझा पोर्टफोलिओ : कृषी-रसायन क्षेत्रातील अग्रणी –  पीआय…
article about the rise and fall of rotomac pen owner vikram kothari
तलवारीपेक्षा लेखणी बलवान !
Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
Gold Silver Price Today : महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर
wipro bonus share issue
‘विप्रो’कडून बक्षीस समभाग पात्रतेसाठी ३ डिसेंबर रेकॉर्ड तारीख निश्चित
stock market updates
बाजाराच्या आकस्मिक मुसंडीमागे, मतदानोत्तर चाचण्यांचा ‘कौल’?
adani group misled indian capital market
अदानींकडून भारताच्या भांडवली बाजाराचीही दिशाभूल?
sebi rules violation loksatta news
‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी

याआधी २००७ मध्ये सोन्याच्या किंमतीत ३१ टक्के वाढ झाली होती. २०१० मध्ये २९.६१ टक्के, तर २०२० मध्ये २५ टक्के वाढ झाली होती. याशिवाय यापूर्वी कधीही सोन्याच्या किंमतीत एकाच वर्षात २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली नव्हती.

सोन्याच्या दरांत सातत्याने वाढ

देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत गगनाला भिडली आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange of India Limited) सोन्याची किंमत ७७,६४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशननुसार (आयबीजेए) बुलियन मार्केटमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,८१० रुपये इतकी आहे.

११ वर्षांमध्ये सोन्याची किंमत अडीच पटीने वाढली

गेल्या ११ वर्षांमध्ये सोनं अडीच पटीने महागलं आहे. जानेवारी २०१४ मध्ये सोनं २९,४६२ रुपये तोळा या भावाने विकलं गेलं. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये सोन्याची किंमत ७७,५७० रुपये इतकी झाली आहे. जुलै २०२० मध्ये सोनं ५३,४४५ रुपये झालं होतं. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये सोन्याची किंमत कमी होऊन ५० हजार रुपयांवर घसरली होती. तर जानेवारी २०२२ मध्ये सोन्याचा दर ४७ हजार रुपये झाला होता. फेब्रुवारी २०२२ पासून सोन्याची किंमत सातत्याने वाढत आहे.

२०१४ नंतर २०१९, २०२० व २०२४ ही तीन वर्षे सोन्यासाठी चांगली ठरली आहेत. सोन्याने २०१९ मध्ये २५ टक्के परतावा दिला. तर २०२० मध्ये २८ टक्के परतावा दिला. यावर्षी १० महिन्यांत सोन्याने ३२ टक्के परतावा दिला आहे. यावर्षी अर्थसंकल्पात तरतूद करून केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केलं नसतं तर सोन्याची किंमत आता ८० हजारांच्या पुढे गेली असती.