Gold Price Increased Today : सणासुदीच्या तोंडावर देशात सोन्याचे भाव वधारले आहेत. देशात सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ७७ हजार रुपये इतका झाला आहे. सोन्यावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून घटवून ६ टक्के करण्यात आलेला असूनही सोन्याचा दर वाढतच आहे. आयात शुल्क कमी केलं नसतं तर आज सोन्याचा दर ८० हजारांच्या पुढे केला असता. देशांतर्गत बाजारासह सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर २,७२७.२० डॉलर/औन्स इतका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य-पूर्व आशियातील तणाव, युद्ध आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे गेल्या ४५ वर्षांत सोन्याने सर्वाधिक परतावा दिला आहे. तर चांदीनेही उच्चांक गाठला असून चार वर्षांमधील सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा ३२.५ टक्के वाढ झाली आहे. १९७९ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.गेल्या साडेचार दशकांमधील म्हणजेच ४५ वर्षांमधील आकडेवारी पाहता २०२४ मध्ये सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी सोन्याच्या किंमतीत तब्बल ३२.५ टक्के वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष संपायला अद्याप दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold gives returns 32 percent highest in last 45 years check latest prices asc
Show comments