Gold Investment Strategy : सोने हा गुंतवणुकीचा असा पर्याय आहे, जो तुम्हाला बाजारातील अनिश्चितता, महागाई, वाढत्या व्याजदराच्या वातावरणात सुरक्षितता देतो. सोन्यामध्ये जरी चढ-उतार होत असले तरी त्याची किंमत वर्षानुवर्षे वाढत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा स्थिर परतावा देणारा पर्याय आहे. त्यामुळे बाजारातील वातावरण काहीही असले तरी ते सोन्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत नाही. तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ खूप चांगली आहे. येत्या काही दिवसांत दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीशिवाय लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढणार आहे. या कारणास्तव तज्ज्ञ सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. जेव्हा किमती कमी होतात, तेव्हा ते गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. फायनान्शिअल एक्सप्रेसकडे तज्ज्ञांनी सोन्यासंदर्भातील आपली मतं व्यक्त केली आहेत.
सोन्याला कोणते घटक आधार देतात?
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या कमोडिटी आणि करन्सीचे प्रमुख अनुज गुप्ता यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेसला सांगितले की, सोन्याचा दृष्टिकोन पूर्णपणे सकारात्मक दिसत आहे. मॉर्गन स्टॅनलीने प्रथम अमेरिकेचे रेटिंग कमी केले आणि आता जेपी मॉर्गनने चीनचे रेटिंग कमी केले आहे. म्हणजेच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अनिश्चितता असल्याचं दिसत आहे. युरोपमध्येही अनिश्चितता वाढली आहे. अमेरिकेतील महागाई फारशी नियंत्रणात नाही, त्यामुळे यूएस फेडने नुकतेच व्याजदर वाढवले आहेत. पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय हा दीर्घकालीन सकारात्मक आहे, देशांतर्गत स्तरावर आगामी सणासुदीचा हंगाम आणि लग्नाचा हंगाम लक्षात घेता मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचाः आता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय
सोन्यामध्ये व्यापार धोरण काय?
अनुज गुप्ता सांगतात की, सोन्याचा भाव सध्या ५८,७५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे. ६०,००० च्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत यामध्ये पहिले लक्ष्य ६०००० रुपये असेल. ही पातळी तुटल्यास सोने प्रतितोळा ६२००० रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकते. सोन्याला ५७५०० वर सपोर्ट मिळत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ५७,५०० वरून तो ५८,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याला २००० रुपयांचा मजबूत प्रतिकार मिळतो. ही पातळी तुटल्यास सोने प्रति औंस २१०० डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात १८५० डॉलरच्या पातळीवर समर्थन आहे. म्हणून १८५० डॉलरवर राहून ते १८७० डॉलरपर्यंत वाढू शकते.
LKP सिक्युरिटीज VP संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेसला सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होण्याची चिन्हे दिसत आहेत आणि भारतात सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे, गुंतवणूकदारांनी सोन्यामधील सकारात्मक ट्रेंडचा फायदा घेण्याचा विचार केला पाहिजे. सोन्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी भारतात सणासुदीला जोरदार मागणी आहे. सोन्यामध्ये ५८५०० आणि ५७००० स्तरांवर एंट्री करता येईल. जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे सोने खरेदीचा कल, अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती, मजबूत डॉलर आणि उच्च व्याजदर या कारणास्तवर सोन्याच्या किमती स्थिर राहणार असल्याचं जतिन त्रिवेदी सांगतात. या बाबी लक्षात घेऊन वर्षअखेरीस ६१००० ते ६२००० पर्यंतचे लक्ष्य ठेवून गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतात, असे ते सांगतात.
हेही वाचाः ‘मेरा बिल मेरा अधिकार’च्या माध्यमातून १ कोटीपर्यंतची बक्षिसे जिंकता येणार, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
आज सोन्याचा भाव काय?
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,७९० असून मागील व्यापार सत्रात ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,६८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७३,८४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत ७३,८६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,८९१ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,७९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८९१ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८९१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,८९१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,७९० रुपये आहे.