बुधवारी भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत बदल होताना दिसत आहेत. दहा ग्रॅम सोने ११० रुपयांनी स्वस्त होऊन ५८,७४० रुपये झाले आहे. एक किलो चांदीचा दर वाढला असून, तो आता ७०,१०० रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ११० रुपयांनी घसरून ५८,७४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५८,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.
आज चांदीचा भाव काय?
मात्र, चांदीचा भाव ३५० रुपयांनी वाढून ७०,१०० रुपये किलो झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, “दिल्ली बाजारात स्पॉट सोन्याचे भाव ११० रुपयांनी घसरून ५८,७४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत.”
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,९६२ डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव २३.१४ डॉलर प्रति औंस झाला. कॉमेक्सवर स्पॉट सोन्याच्या किमती ०.६० टक्क्यांनी घसरून १,९६२ प्रति औंस डॉलर झाल्या आहेत.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.
फेब्रुवारीमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढली
महत्त्वाचे म्हणजे चीन आणि मध्य पूर्व बाजारपेठांमधील मागणीत सुधारणा झाल्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढून २८,८३२.८६ कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात २३,३२६.८० कोटी रुपये होती.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)