Gold-Silver Rates Today:आज ५ एप्रिल २०२३ला भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. मजबूत जागतिक ट्रेंड दरम्यान सराफा बाजारात १० ग्रॅम सोने महाग झाले आहे आणि ६१,०८० रुपयांवर पोहोचले आहे. यासह सोन्याने नवा उच्चांक गाठला. एक किलो चांदीच्या दरातही वाढ झाली असून, आता त्याची किलोमागे ७०,५०० रुपयांना विक्री होत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १,०२५ रुपयांनी वाढून ६१,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ६०,०५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांदी किती महाग झाली?

विशेष म्हणजे चांदीचा भावही १,८१० रुपयांनी वाढून ७३,९५० रुपये प्रति किलोवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, “दिल्लीतील स्पॉट सोन्याचा भाव १,०२५ रुपयांनी मजबूत होऊन ६१,०८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.” देशांतर्गत बाजारात सोन्याने ६१,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी ओलांडली आहे.

परदेशी बाजारात सोन्याची घसरण

परदेशी बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे २,०२७ डॉलर प्रति औंस आणि २४.०४ डॉलर प्रति औंस होते.

हेही वाचाः मोठी बातमी! मुंबईतील एअर इंडियाची इमारत शिंदे सरकार ‘इतक्या’ कोटींना विकत घेणार

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या

विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवे दर पाहू शकता.

फेब्रुवारीमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढली

महत्त्वाचे म्हणजे चीन आणि मध्य पूर्व बाजारपेठांमधील मागणीत सुधारणा झाल्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात २४ टक्क्यांनी वाढून २८,८३२.८६ कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात २३,३२६.८० कोटी रुपये होती.

हेही वाचाः चुकीच्या मार्गाने परदेशात पैसे पाठवताय मग सावधान! आता प्राप्तिकर विभागाची तुमच्यावर नजर

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rates today tremendous bounce in gold reached a new high what is the price of 10 gram gold vrd
Show comments