ICICI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ICICI Bank Golden Year FD’ या विशेष FD योजनेची अंतिम तारीख सहा महिन्यांनी वाढवली आहे. आता बँकेचे ग्राहक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत या विशेष एफडी योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी ही एफडी योजना शुक्रवारी संपत होती.
ICICI बँक गोल्डन इयर्स FD वर व्याज किती?
ICICI बँक गोल्डन इयर्स FD सामान्य FD च्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देते. सध्या ५ वर्षांच्या एका दिवसापासून ते १० वर्षांपर्यंतच्या या विशेष एफडीवर ७.५ टक्के व्याज दिले जात आहे.
ICICI बँक गोल्डन इयर्स FD ची खास वैशिष्ट्ये
>> या FD वर ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या ०.५० टक्के व्याजदराव्यतिरिक्त ०.१० टक्के व्याज मर्यादित काळासाठी दिले जात आहे.
>> नवीन FD सह नूतनीकरणावर अतिरिक्त व्याजदर दिला जात आहे.
>> या योजनेत फक्त दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी करता येते.
>> ICICI बँक गोल्डन इयर्स FD चा कार्यकाळ ५ वर्षांच्या एका दिवसापासून १० वर्षांपर्यंत असू शकतो.
हेही वाचा: मोदी सरकारकडून आठ वर्षांत २३ लाख कोटींपेक्षा जास्तीचे कर्जवाटप, तुम्हीही ‘या’ योजनेचा घेऊ शकता फायदा
मुदत संपण्यापूर्वी तुम्ही पैसे काढू शकता
जर तुम्हाला FD केल्यानंतर पैशांची गरज असेल, तर तुम्ही या FD मध्ये ५ वर्षांनी आणि कालावधी पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी कोणतेही शुल्क न घेता पैसे काढू शकता. जर तुम्ही पाच वर्षापूर्वी पैसे काढले तर तुम्हाला १ टक्के दंड भरावा लागेल.
तुम्ही फायदा कसा घेऊ शकता?
तुम्हाला या विशेष योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही बँकेच्या इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे एफडी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या ICICI बँकेच्या शाखेलाही भेट देऊ शकता.
हेही वाचाः तुमच्या मुलीसाठी २१ वर्षांत बनवा ४१ लाखांचा निधी, नेमकी योजना काय?