तुम्ही बँक एफडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली आहे. FD व्याजदरात बँकेने ४० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.४० टक्के वाढ केली आहे. यानंतर गुंतवणूकदारांना ४४४ दिवसांच्या विशेष एफडीवर ८ टक्के व्याज मिळत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १० एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत. बँक आपल्या ग्राहकांना ७ दिवस ते ३ वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीच्या मुदतीसह FD ऑफर करत आहे.

FD वर व्याजदर काय?

>> ७ दिवसांपासून २९ दिवसांपर्यंत FD वर- ४.०० टक्के
>> ३० दिवस ते ९० दिवस FD वर – ४.२५ टक्के
>> ९१ दिवसांपासून ते १७९ दिवसांपर्यंतच्या FD वर – ४.५० टक्के
>> १८० दिवसांपासून ते २६९ दिवसांपर्यंतच्या FD वर – ४.९५ टक्के
>> २७० दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर – ५.३५ टक्के
>> एक वर्षापासून दोन वर्षांहून कमी कालावधीच्या FD वर (४४४ दिवसांच्या विशेष FD व्यतिरिक्त) – ६.५० टक्के
>> दोन वर्षापासून तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर – ६.८० टक्के
>> तीन वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीच्या FD वर – ६.५० टक्के

हेही वाचाः बँकेतून आता पोस्टातील बचत खाते, PPF आणि SSA मध्ये पैसे पाठवणं झालं सोपं, सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा

४४४ दिवसांची विशेष FD

बँकेकडून ४४४ दिवसांची विशेष एफडी देखील चालवली जात आहे. ज्यावरील व्याज इतर कालावधीच्या FD च्या तुलनेत सर्वाधिक आहे. या FD वर सर्वसामान्य नागरिकांना ७.२५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के (६० वर्षे किंवा त्याहून अधिक) आणि ८.०० टक्के व्याज दिले जात आहे.

हेही वाचाः पगारातून पै अन् पै जमवली, म्हातारपणात सुरू केला व्यवसाय, वयाच्या ९२ व्या वर्षी २० हजार कोटींच्या कंपनीचे मालक

Story img Loader