SBI Debit Card Charges:एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून २०६.५० रुपये कापले गेले असतील, तर तुम्ही एकमेव व्यक्ती नाही, ज्यांच्या खात्यातून ही रक्कम कापली गेली आहे. खरं तर असे अनेक ग्राहकांसोबत घडले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विविध डेबिट/एटीएम कार्डधारक ग्राहकांच्या बचत खात्यातून रुपये १४७, २०६.५० किंवा रुपये २९५ कापते. तुम्हीदेखील SBI चे ग्राहक असाल आणि तिची बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणावर वापरत असाल, तर वर्षातून एकदा तुमच्या बचत खात्यातून काही कपात केली जाते. या कपातीनंतर अनेकांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात.

SBI खातेदारांच्या खात्यातून १४७ किंवा २९५ रुपये कापले गेले

स्टेट बँकेनेही तुमच्या बचत खात्यातून २०६.५० रुपये कापले आहेत, म्हणून तुम्ही चिंतेत आहात, तुम्ही कोणताही व्यवहार न करता बँकेने हे पैसे का कापले, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अनेक SBI खातेधारकांच्या खात्यातून १४७ किंवा २९५ रुपये कापले गेले आहेत. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया युवा, गोल्ड, कॉम्बो किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्ड असलेल्या ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारते. युवा डेबिट कार्ड, गोल्ड डेबिट कार्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्डसह यापैकी कोणतेही डेबिट/एटीएम कार्ड वापरणाऱ्या लोकांकडून SBI वार्षिक देखभाल शुल्क म्हणून १७५ रुपये आकारते. त्याच वेळी या वजावटीवर १८% GST देखील लागू आहे, म्हणून ३१.५० (१७५ च्या रुपयांचे १८%) GST रकमेत जोडले गेलेत, म्हणून १७५ + ३१.५० रुपयांसह ही रक्कम २०६.५० रुपये होते, आता तुम्हाला समजलेच असेल की, स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्या बचत खात्यातून २०६.५० रुपये का आणि कसे कापले?

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर

बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. आता खातेदारांना थेट व्हॉटसअ‍ॅपवर बँक बॅलन्स तपासता येणार आहे. इतकेच नाही तर मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप अशा अनेक सुविधा व्हॉटसअ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

Story img Loader