Fixed Deposit Interest Rate: श्रीराम फायनान्सने अलीकडेच महिला व ज्येष्ठ नागरिक खातेधारकांना मुदत ठेव (Fixed Deposit) वर ९.३६% पर्यंत व्याज दर देणार असल्याचे सांगितले आहे. श्रीराम फायनान्स ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल NBFC पैकी एक आहे.एनबीएफसीने १ जानेवारी २०२३ पासून व्याजदरात ५-३० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. सुधारित दर १२ महिने ते ६० महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होतील. एनबीएफसीने सर्व मुदत ठेवींच्या नूतनीकरणांवर अतिरिक्त ०. २५% व्याज देणार असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीराम फायनान्सचे सुधारित व्याजदर खालीलप्रमाणे…

१ जानेवारीपासून सुधारित व्याजदर

मुदत कालावधी व्याज दर 
12 महिने 7.3% व्याज 
18 महिने 7.5 % व्याज 
24 महिने 7.75% व्याज 
30 महिने 8% व्याज 
36 महिने 8.15% व्याज 
42 महिने 8.20% व्याज
48 महिने 8.25% व्याज 
60 महिने 8.45% व्याज 

ज्येष्ठ नागरिकांसाठी १ जानेवारीपासून सुधारित व्याजदर

मुदत कालावधी व्याज दर 
12 महिने 7.83% व्याज 
18 महिने 8.04% व्याज 
24 महिने 8.28% व्याज 
30 महिने 8.54% व्याज 
36 महिने 8.69% व्याज 
42 महिने 8.74% व्याज
48 महिने 8.79% व्याज 
60 महिने 8.99% व्याज 

महिला+ज्येष्ठ नागरिक+नूतनीकरणासाठी १ जानेवारीपासून सुधारित व्याजदर

मुदत कालावधी व्याज दर 
12 महिने 7.83% व्याज 
18 महिने 8.04% व्याज 
24 महिने 8.28% व्याज 
30 महिने 8.54% व्याज 
36 महिने 8.69% व्याज 
42 महिने 8.74% व्याज
48 महिने 8.79% व्याज 
60 महिने 8.99% व्याज 

वरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, श्रीराम फायनान्स अधिक ०.५% वार्षिक व्याज देते तर NFBC महिला ठेवीदारांना अतिरिक्त ०.१०% व्याज दराचा लाभ घेता येतो. सर्व नूतनीकरणांवर अतिरिक्त ०.२५% व्याज दर उपलब्ध आहे.

श्रीराम फायनान्स एफडीमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न श्रीराम फायनान्स ही कंपनी एनबीएफसी आहे आणि श्रीराम ग्रुपचा एक भाग आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या NFBC पैकी एक आहे. NBFC द्वारे ऑफर केलेल्या फिक्स डिपॉझिट आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांच्या अधीन आहेत. या ठेवींना आरबीआयच्या नियमांनुसार नियमित बँकांद्वारे ऑफर केलेली ५ लाख ठेव विमा हमी मिळत नाही. त्यामुळे एनबीएफसीने ऑफर केलेल्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ठेवीदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest interest rate on fixed deposit up to 9 36 offered by this nbfc women additional profit check chart svs