बँकांनी त्यांच्या सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) किंवा ई रूपी ऍप्लिकेशनसह युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) क्विक रिस्पॉन्स (QR) कोडची इंटरऑपरेबिलिटी सक्षम केल्यामुळे किरकोळ डिजिटल रुपयात व्यवहार करणाऱ्या युजर्सला आता कोणताही UPI QR स्कॅन करून व्यवहार करता येणार आहेत. व्यापारी त्यांच्या विद्यमान UPI QR कोडद्वारे डिजिटल रुपे पेमेंट देखील स्वीकारू शकतात. UPI आणि CBDC चे हे एकत्रीकरण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या किरकोळ डिजिटल रुपयाला म्हणजे ई रुपीला चालना देण्याच्या पथदर्शी कार्यक्रमाचा एक भाग आहे.
इंटरऑपरेबिलिटी (interoperability) म्हणजे काय?
इंटरऑपरेबिलिटी ही तांत्रिक सुसंगतता आहे, जी पेमेंट सिस्टमला इतर पेमेंट सिस्टमसह वापरण्यास सक्षम बनवते. इंटरऑपरेबिलिटी सिस्टीम प्रदाते आणि विविध सिस्टीममधील सहभागींना अनेक सिस्टीममध्ये भाग न घेता संपूर्ण सिस्टममध्ये पेमेंट व्यवहार करण्याबरोबरच स्पष्ट आणि सेटल करण्याची परवानगी देते. पेमेंट सिस्टममधील इंटरऑपरेबिलिटी अंतिम युजर्ससाठी नावीन्य आणि कार्यक्षमता साध्य करण्यासाठी मदतगार ठरते.
UPI QR कोड CBDC इंटरऑपरेबिलिटी म्हणजे काय?
डिजिटल रुपयासह UPI ची इंटरऑपरेबिलिटी म्हणजे सर्व UPI QR कोड CBDC अॅप्सशी सुसंगत असल्याचे द्योतक आहे. सुरुवातीला जेव्हा किरकोळ डिजिटल रुपयासाठी पायलट पोजेक्ट लॉन्च केला गेला, त्यावेळी ई रुपी युजर्सना व्यवहार करण्यासाठी विशिष्ट QR कोड स्कॅन करावा लागत होता. दोघांच्या परस्पर कार्यक्षमतेसह एकच QR कोड वापरून पेमेंट केले जाऊ शकते. RBI किंवा CBDC द्वारे जारी केलेला डिजिटल रुपया ही रुपयाची टोकनाइज्ड डिजिटल आवृत्ती आहे. ई-रुपी हे डिजिटल वॉलेटमध्ये ठेवलेले असते, जे ग्राहकांच्या विद्यमान बचत बँक खात्याशी जोडलेले असते. UPI थेट ग्राहकाच्या खात्याशी जोडलेले असते.
त्याचा ग्राहक आणि व्यापाऱ्यांना कसा फायदा होणार?
UPI आणि CBDC ची इंटरऑपरेबिलिटी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये स्विच न करता ग्राहक आणि व्यापारी यांच्यात अखंड व्यवहार सुनिश्चित करणार आहे. हे डिजिटल रुपी वापरकर्त्याला कोणत्याही व्यापारी आउटलेटवर कोणतेही UPI QR कोड स्कॅन करून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी जसे की, किराणा सामान आणि औषधे पेमेंट करण्यास अनुमती देणार आहे. व्यापार्यांनासुद्धा डिजिटल रुपयाचे पेमेंट स्वीकारण्यासाठी वेगळा QR कोड ठेवण्याची आवश्यकता नाही. ते त्यांच्या विद्यमान QR कोडवर CBDC पेमेंट स्वीकारू शकतात. “CBDC मधील व्यवहार वाढवण्यासाठी आम्ही UPI नेटवर्कचा फायदा घेता येणार आहे. एक QR कोड असेल आणि तुम्ही CBDC अॅप वापरून QR कोड स्कॅन करू शकता. व्यापार्याचे CBDC खाते असल्यास पेमेंट CBDC वॉलेटमध्ये सेटल केले जाणार आहे. जर एखाद्या व्यापाऱ्याकडे CBDC खाते नसेल तर UPI वापरून पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल,”असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांनी यंदा जुलैमध्ये सांगितले.
हेही वाचाः Money Mantra : पत्नीच्या नावावर सोने खरेदी करून कर बचत करता येते का? नियम काय सांगतो?
QR कोड म्हणजे काय?
क्विक रिस्पॉन्स (QR) कोडमध्ये पांढऱ्या रंगांत स्क्वेअर ग्रीडमध्ये काळ्या चौकोनांचा समावेश केलेला असतो, जो कॅमेऱ्यासारख्या इमेजिंग उपकरणाद्वारे वाचता येतो म्हणजेच स्कॅन करता येतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या म्हणण्यानुसार, ती ज्या वस्तूशी जोडली आहे, त्याबद्दल माहिती त्यात असते. QR कोड हे पेमेंटचे पर्यायी संपर्करहित चॅनेल माध्यम आहे. हे व्यापारी किंवा व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांकडून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये पेमेंट स्वीकारण्याची परवानगी देतात.
इंटरऑपरेबिलिटी सीबीडीसी प्रणाली स्वीकारण्यासाठी कशी मदत करणार?
सध्या UPI ही मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारी पेमेंट पद्धत आहे आणि ती आणि CBDC यांच्यातील आंतरकार्यक्षमता डिजिटल रुपयाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणार आहे. सध्या ७० हून अधिक मोबाइल अॅप्स आणि ५० दशलक्षाहून अधिक व्यापारी UPI पेमेंट स्वीकारतात. जुलैमध्ये आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर शंकर म्हणाले की, रिटेल डिजिटल रुपयाचा वापर करणारे १.३ दशलक्ष ग्राहक आणि ०.३ दशलक्ष व्यापारी आहेत. जुलैमध्ये दररोजचे ई रुपी व्यवहार सुमारे ५०००-१०००० होते. SBI ने म्हटले आहे की, UPI सह CBDC चे अखंड एकीकरण दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल चलनांची स्वीकृती आणि वापर वाढवणार आहे. ” खरं तर हे एकत्रीकरण डिजिटल चलन इकोसिस्टमसाठी गेमचेंजर ठरणार आहे,” असे त्यात म्हटले आहे.
किती बँकांनी UPI आणि CBDC इंटरऑपरेबिलिटी सक्षम केली आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यासह काही बँकांनी त्यांच्या डिजिटल रुपी अॅप्लिकेशनवर UPI इंटरऑपरेबिलिटी सुरू केली आहे.