कर्नाटक निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. काँग्रेस आणि भाजपशिवाय राज्यातील इतर पक्षांनीही उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने देशातील सर्वात श्रीमंत आमदार असलेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. देशात ४००० हून अधिक आमदार आहेत, त्यापैकी कुणाकडेही या उमेदवाराइतकी संपत्ती नाही. एन नागराजू असे त्या उमेदवाराचे नाव आहे. सोमवारी त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. जिथे त्यांनी आपले उत्पन्न आणि स्त्रोत याबद्दल माहिती दिली. त्यांना देशातील सर्वात श्रीमंत आमदार का म्हटले जाते हे देखील जाणून घेऊयात.

देशातील सर्वात श्रीमंत आमदार

देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन नागराजू यांनी राज्यातील १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना एकूण १,६०९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली. त्यांनी सोमवारी बंगळुरूच्या बाहेरील होस्कोटे विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. नागराजू यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत:ला शेतकरी आणि व्यापारी असल्याचे सांगितले आहे. त्यांची पत्नी एम शांताकुमारी या गृहिणी आहेत, त्यांच्याकडे एकूण ५३६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पती-पत्नी दोघांची स्थावर मालमत्ता १,०७३ कोटी रुपये आहे.

Arvind Kejriwal
Delhi : महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘या’ केंद्रशासित प्रदेशात राबवणार लाडकी बहीण योजना; नावनोंदणीही सुरू!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर

२०२० मध्ये १२२० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर

नागराजू सध्या एमएलसी आहेत. जून २०२० मध्ये विधान परिषद निवडणूक लढवताना त्यांनी पत्नीसह सुमारे १,२२० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. सध्याच्या प्रतिज्ञापत्रात या जोडप्याने एकूण ९८.३६ कोटी रुपयांचे दायित्व घोषित केले आहे. इयत्ता ९वी पर्यंत शिकलेल्या नागराजू (७२) यांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत शेती, घर मालमत्ता, व्यवसाय आणि इतर स्त्रोत दिले आहेत, त्यांच्या पत्नीकडे देखील घराची मालमत्ता आणि इतर स्त्रोत आहेत.

हेही वाचाः VIDEO: देशातील पहिले Apple चे रिटेल स्टोअर मुंबईत झाले सुरु, CEO टीम कुक यांनी केले ग्राहकांचे स्वागत

पाच वर्षांत ५९ टक्के वाढ

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर होस्कोटे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपली एकूण संपत्ती १,०१५ रुपये असल्याचे घोषित केले होते. याचाच अर्थ नागराजू यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत सुमारे ६०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टक्केवारीत पाहिल्यास नागराजू यांच्या मालमत्तेत ५९ टक्के वाढ झाली आहे, जे खूप जास्त आहे.

हेही वाचाः Avalon Technologies चे शेअर्स सवलतीत लिस्टिंग, दोन पटीपेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाला IPO

काँग्रेसशी संबंध तोडून भाजपमध्ये प्रवेश केला

नागराजू २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून होस्कोटे विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. ते १७ आमदारांपैकी एक होते, ज्यांनी नंतर भाजप पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेस-जेडी(एस) युतीचे सरकार पडले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ते होस्कोटे येथून अपक्ष उमेदवार शरथ बाचेगौडा यांच्याविरुद्ध पराभूत झाले, जे आता काँग्रेससोबत आहेत. दोघेही एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी बनले असून, पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

Story img Loader