India GDP grows by 6.7 percent in first quarter 2023 : भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा म्हणजेच जीडीपी दर गेल्या पाच तिमाहींमध्ये सर्वात कमी आहे. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीतला जीडीपीचा दर ६.७ टक्के इतका घसरला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत भारताच्या जीडीपीचा दर ८.२ टक्के इतका होता. शासकीय आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे कृषी क्षेत्राची खराब कामगिरी. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील बहुतांश भागात कृषी क्षेताला मोठा फटका बसला आहे. कृषी उत्पादन इतकं कमी झालं की त्याचा थेट जीडीपीवर परिणाम झाला आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय की भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या जीडीपीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in