भारताची पामतेल आयात मे महिन्यात १४.५९ टक्क्याने कमी होऊन ४ लाख ३९ हजार १७३ टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या वाढली आहे आहे, अशी माहिती सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) गुरुवारी दिली.

एसएईने दिलेल्या माहितीनुसार, वनस्पती तेलाच्या आयातीत जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. भारताने मागील वर्षी मे महिन्यात पामतेलाची ५ लाख १४ हजार २२ टन आयात केली होती. यंदा मे महिन्यात त्यात घट झाली आहे. याचबरोबर एकूण वनस्पती तेलाच्या आयातीतही किंचित घट झाली आहे. ही आयात मे महिन्यात १० लाख ५८ हजार २६३ टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १० लाख ६१ हजार ४१६ टन होती. देशाच्या एकूण वनस्पती तेल आयातीत पामतेलाचा वाटा ५९ टक्के आहे.

8.12 lakh tonnes of soybeans were procured at guaranteed prices 37 lakh sold privately
३८ लाख टन सोयाबीन कवडीमोल दरात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Greenhouse gas emissions from country decreased 7 93 percent in 2020
हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची

हेही वाचाः वस्तू व्यापार तूट मे महिन्यात २२.१ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर; निर्यातीत १० टक्के घट

सूर्यफुल तेलाच्या आयातीत मेमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही आयात २.९५ लाख टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १.१८ लाख टन होती. खाद्यतेलाचा देशातील साठा सध्या ७.३८ लाख टन आहे. याचबरोबर आगामी काळात २२.०३ लाख टन खाद्यतेलाची देशात आयात होईल. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करतो. याचबरोबर अर्जेंटिनातून सोयाबीन तेल आणि युक्रेन व रशियातून सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.

हेही वाचाः गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला; ‘बीएसई’चे एकत्रित बाजार भांडवल विक्रमी २९२ लाख कोटींपुढे

Story img Loader