India’s Top 10 Billionaire : देशात २९ टक्क्यांनी अब्जाधिशांची संख्या वाढली असून आता ३३४ झाली आहे. हुरून इंडिया रिचलिस्टने २९ ऑगस्ट रोजी अब्जाधिशांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार प्रत्येक पाच दिवसांनी एका अब्जाधीशाची संख्या वाढत आहे.

हुरुन या यादीत मुंबई आणि दिल्ली दुसर्‍या स्थानावर आहे. तर बंगळुरूला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर हैदराबादने स्थान पटाकवले आहे. या यादीत १७ नव्या अब्जाधीशांची वाढ झाली आहे. Razorpay चे संस्थापक – हर्षिल माथूर आणि शशांक कुमार हे या यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश आहे. दोघेही ३३ वर्षांचे आहेत. तर त्यांच्या खालोखाल झेप्टोचे २१ वर्षीय कैवल्य वोहरा आणि झेप्टोचे २२ वर्षीय सहसंस्थापक आदित पालिचा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या वर्षीच्या यादीत ९० च्या दशकात जन्मलेल्या ११ लोकांचा समावेश आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

हेही वाचा >> शाहरुख खानचा अतिश्रीमंतांच्या यादीत प्रथमच प्रवेश; ७,३०० कोटींची संपत्ती, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्या क्रमांकावर

यावर्षी, हुरुन रिचलिस्टमध्ये १ हजार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मालमत्ता असलेले १५३९ लोक आहे. तर, यामध्ये २७२ जणांची नव्याने नावं जोडण्यात आली आहेत. IPL संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि चित्रपट निर्मिती कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील त्याच्या भागीदारीमुळे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने वयाच्या ५८ व्या वर्षी ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह प्रथमच श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले.

देशातील अतिश्रीमंतांची यादी पाहा (Top 10 Richest Persons in India)

क्रमांकनावेकंपनीसंपत्ती (कोटींमध्ये)
गौतम अदाणीअदाणी समूह१,१६१,८००
मुकेश अंबानीरिलायन्स समूह१,०१४,७००
शिव नाडारएचसीएल३१४,०००
सायरस पुनावालासीरम इन्स्टिट्यूट२८९,८००
दिलीप शांघवीसन फार्मास्युटिकल२४९,९००
कुमार बिर्लाआदित्य बिर्ला२३५,२००
गोपिचंद हिंदूजाहिंदूजा१९२,७००
राधाकिशन दमानीअॅव्हॅन्यू सुपरमार्ट्स१९०,९००
अझिम प्रेमजीविप्रो१९०,७००
१०नीरज बजाजबजाज१६२,८००

हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, देश आशियातील संपत्ती निर्मितीचं इंजिन म्हणून उदयास येत आहे. चीनच्या अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे, तर भारतात २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.”

यादीत अनेक बॉलीवूडकरांचा समावेश

शाहरुख खान व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, जुही चावला, करण जोहर आणि हृतिक रोशन यांचीही नावे या यादीत आहेत. या स्टार्सनीही या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवलं आहे. यादीनुसार, अमिताभ बच्चन यांची संपत्ती १६०० कोटी, जुही चावलाची एकूण संपत्ती ४,६०० कोटी, हृतिक रोशनची संपत्ती दोन हजार कोटी आणि करण जोहरची एकूण संपत्ती १४०० कोटी आहे. या यादीत शाहरुख खाननंतर जुही चावलाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि शेवटी करण जोहरचे नाव आहे.