भारतातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांची इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते २०२४ पर्यंत या पदावर राहणार आहेत. अल्बर्स हे सध्याचे चेअरमन आणि रवांडएअरचे सीईओ यवोन मांझी मकोलो यांची जागा घेणार आहेत.
IATA म्हणजे काय?
IATA चे पूर्ण नाव इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे. ही जगातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. यामध्ये सुमारे ३०० एअरलाईन्स आहेत, ज्यांचा जगातील हवाई वाहतुकीत वाटा ८३ टक्के आहे. IATA च्या वेबसाइटनुसार, ही संघटना विमान वाहतूक उपक्रमांना समर्थन देते आणि विमान वाहतुकीच्या गंभीर समस्यांवर धोरण तयार करण्यात मदत करते. IATA ची स्थापना १९ एप्रिल १९४५ रोजी क्युबातील हवाना येथे झाली. स्थापनेच्या वेळी IATA चे ३१ देशांत ५७ सदस्य होते, बहुतेक युरोप आणि उत्तर अमेरिकेतील होते. आज १२० देशांतील ३०० सदस्य या गटाचा भाग आहेत.
हेही वाचाः ५६,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात भूषण स्टीलच्या माजी एमडीला ईडीकडून अटक
एअर इंडियाही बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचा भाग बनली
टाटा सन्सच्या मालकीच्या एअर इंडियाची गेल्या आठवड्यात इस्तंबूल येथे झालेल्या IATA एजीएममध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नरसाठी निवड झाली. एअर इंडियाने अनेक वर्षांच्या कालावधीनंतर बोर्डात सामील होणे ही भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मोठी उपलब्धी मानली जाते. एअर इंडिया IATA मध्ये सामील झाल्यामुळे भारतीय बाजू अधिक मजबूत होणार आहे. त्यात इंडिगोचा भारतीय प्रतिनिधी आधीपासूनच संघटनेत होता. सध्या भारतीय बाजारपेठ जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. IATA मध्ये भारतीय प्रतिनिधित्व वाढल्याने भारतीय विमान वाहतूक बाजाराला फायदा होणार आहे.
हेही वाचाः घर खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ८ बँकांमध्ये स्वस्त गृहकर्ज उपलब्ध, नवे दर तपासा