ISRO Scientist Salary: २३ ऑगस्ट रोजी इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर, ISRO ने आता आदित्य-L1 नावाची पहिली सौर मोहीम देखील प्रक्षेपित केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत सूर्याचा अभ्यास करणारआहे. २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले. चांद्रयान ३ चे यश आणि आता थेट सूर्याकडे झेप यामुळे ISRO चे वैज्ञानिक सध्या प्रचंड चर्चेत आहेत. देशातील अत्यंत बुद्धिमान अशी ओळख प्राप्त केलेल्या वैज्ञानिकांना त्यांच्या कामासाठी किती मानधन मिळते याविषयी सुद्धा अनेकांना कुतूहल आहे. आज आपण सातव्या वेतन आयोगानुसार इस्रोच्या टीमला साधारण किती पगार मिळतो याच्या सरासरीचा अंदाज घेऊया..
अहवालानुसार, इस्रोमध्ये अभियंत्यांना ३७,४०० ते ६७,०० रुपयांपर्यंत पगार मिळतो. वरिष्ठ शास्त्रज्ञांना ७५,००० ते८०,००० रुपये पगार मिळतो, तर इस्रोच्या प्रतिष्ठित शास्त्रज्ञांना दरमहा २लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय विविध पदांनुसार शास्त्रज्ञांना १,८२,००० आणि इंजिनिअर्सना दीड लाखापर्यंत पगार दिला जातो. डीएनए या साईटने दर्शवलेल्या अहवालानुसार ISRO च्या कर्मचाऱ्यांचा पदनिहाय पगार किती हे सांगणारा हा तक्ता तपासून पाहा..
ISRO च्या वैज्ञानिकांचा पगार व पद
पद | पगार (रुपये) |
तंत्रज्ञ-B L-3 | (21,700 – 69,100) |
तांत्रिक सहाय्यक L-7वैज्ञानिक सहाय्यक L-7लायब्ररी असिस्टंट ‘A’ – L-7 | (44,900-1,42,400) |
शास्त्रज्ञ/अभियंता-SC – L-10 | (56,100-1,77,500) |
शास्त्रज्ञ/अभियंता-SD – L-11 | (67,700-2,08,700) |
वैद्यकीय अधिकारी-SC – L-10 | (56,100-1,77,500) |
वैद्यकीय अधिकारी-SD – L-11 | (67,700-2,08,700) |
रेडियोग्राफर-A – L-4 | (25,500-81,100) |
फार्मासिस्ट-A – L-5 | (29,200-92,300) |
लॅब टेक्निशियन-A – L-4 | (25,500-81,100) |
नर्स-बी – L-7 | (44,900-1,42,400) |
सिस्टर-ए – L-8 | (47,600-1,51,100) |
कुक – L-2 | (19,900-63,200) |
फायरमन-ए – एल-2 | (19,900-63,200) |
ड्रायव्हर-कम-ऑपरेटर-A – L-3 | (21,700-69,100) |
हलके वाहन चालक-A – L-2अवजड वाहन चालक-A – L-2स्टाफ कारचालक ‘A’ – L-2 | (19,900-63,200) |
दरम्यान, ISRO मध्ये उच्च पदावर कार्यरत वैज्ञानिक व शास्त्रज्ञ, कर्मचाऱ्यांना पगारासह 7 व्या वेतन आयोगानुसार अतिरिक्त भत्ते आणि बोनस सुद्धा दिला जातो. आपणही देशातील सर्वोच्च मानाच्या संस्थांमधील एक असलेल्या इस्रोमध्ये नोकरीची संधी शोधत असाल तर इस्रोच्या अधिकृत वेबसाईटला आवर्जून भेट द्या. शिवाय आपण Loksatta.com च्या करिअर पेजवर सुद्धा अपडेट्स मिळवू शकता.