बऱ्याचदा कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर ती सर्वात पहिल्यांदा गुगलवर ट्रेंड होते. परंतु आजकाल Google वर सर्वात जास्त काय ट्रेंड होते हे तुम्हाला माहिती आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच लक्षद्वीपला जाऊन आले आहेत, त्यानंतर लक्षद्वीप जगभरात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपमध्ये आल्यानंतर गेल्या काही दिवसांत लक्षद्वीप गुगलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहे की, गेल्या २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील बहुतेक लोक मालदीवला भेट देतात, गेल्या वर्षी २.०९ लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. परंतु आता गुगल सर्चमध्येही लोकांनी मालदीवऐवजी लक्षद्वीप सर्च केल्यानं २० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक झालाय. आगामी काळात मालदीव नव्हे, तर लक्षद्वीप हे भारतीय पर्यटकांचे आवडते ठिकाण बनल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पीएम मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीप हे गुगलवर सर्वाधिक ट्रेंडिंग डेस्टिनेशन ठरले आहे. विशेष म्हणजे लक्षद्वीप गेल्या महिन्यात सर्चमध्ये मालदीवपेक्षा फार मागे होतं. परंतु आता लक्षद्वीपने गुगल सर्चमध्ये २० वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. मालदीवमध्येही लक्षद्वीप सर्च केलं जातंय. त्यामुळेच अनेकांनी मालदीव सोडून आता लक्षद्वीपला तिकीट बुक करणे सुरू केल्याचं चित्रही निर्माण झालं आहे.

हेही वाचाः सिंगापूर अन् बँकॉक प्रवासापेक्षाही अयोध्येची विमान स्वारी महाग, तिकिटांचे दर गगनाला भिडले

लक्षद्वीपमध्ये पर्यटक वाढू शकतात

३६ बेटांचा समूह असलेला लक्षद्वीप हा ३२ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. लक्षद्वीप हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, परंतु असे असूनही येथे कमी लोक भेट देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हेही वाचाः पंतप्रधान मोदींवरील मालदीवच्या आक्षेपार्ह टीकेमुळे देशातील व्यापारी अन् उद्योगपती संतापले, उचलले ‘हे’ मोठे पाऊल

लक्षद्वीप बेटावर कसे जायचे?

तुम्हीही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होईल की, लक्षद्वीपला कसे जायचे? तुम्ही ट्रेन किंवा विमानाने केरळमधील कोचीला पोहोचू शकता. कोचीला पोहोचल्यानंतर लक्षद्वीपला जाण्यासाठी जहाजाने जावे लागते.

लक्षद्वीपमध्ये का गेले होते पंतप्रधान मोदी?

कोची-लक्षद्वीप द्वीपसमूह पाणबुडी ऑप्टिकल फायबर कनेक्शनचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले होते. तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा आणि अंगणवाडी केंद्रांच्या नूतनीकरणासाठी पंतप्रधान मोदींनी पायाभरणी केली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshadweep breaks 20 year record in google search too residents of maldives are also searching for lakshadweep vrd