PSU Bank Latest Fixed Deposit Rates: भारतात आजही गुंतवणूक करण्यासाठी बँकेत मुदत ठेवी ठेवण्यास पसंती दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांसह अनेकजण मुदत ठेवींकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत (PSU) योग्य व्याज दर पाहून खातेदार मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यामुळेच बँकांनी जर व्याज दरात बदल केले तर गुंतवणूकदारांच्यादृष्टीने ते महत्त्वाचे असते. मागच्या दोन महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याज दरात बदल केले आहेत.

कोणत्या बँकांनी व्याज दरात बदल केले?

यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि इतर बँकांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या व्याज दरात बदल केले आहेत. यूनियन बँक आणि बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवर सर्वाधिक म्हणजेच ३३३ दिवसांसाठी ७.४० टक्क्यांचा व्याज दर देऊ केला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्ष आणि त्याहून अधिक) ०.५० टक्क्यांचा अधिकचा लाभ मिळणार आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षांहून अधिक वय) ०.७५ टक्के अधिक व्याज मिळणार आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे.

National Pension Scheme
NPS Calculator : निवृत्तीनंतर दीड लाख रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी पंचविशीत असताना काय करायला हवं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
India GDP growth rate slows down freepik
India GDP Rate : भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण; जीडीपी अवघा ६.७ टक्क्यांवर, गेल्या पाच तिमाहीतला सर्वात कमी दर
Mauritius FSC remark on Hindenburg Research
Mauritius FSC : हिंडेनबर्गच्या सेबी अध्यक्षांवरील आरोपांवर मॉरिशसची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचा देश…”
How to manage debt, debt, loan,
 कर्ज व्यवस्थापन कसे कराल?
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!
Share Market Today
Share Market Today : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ३५० अंकांनी पडला तर निफ्टी २४३०० च्या खाली

हे वाचा >> Hindenburg Research : हिंडेनबर्गप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया, सेबी आणि माधबी पुरी बुचबाबत म्हणाले…

पैसाबाजारवर आलेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडौदा ३९९ दिवसांसाठी ७.२५ टक्क्यांचा व्याज दर देत आहे. बँक ऑफ इंडिया ६६६ दिवसांसाठी ७.३ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ७७७ दिवसांसाठी ७.२५ टक्के, कॅनरा बँक ४४४ दिवसांसाठी ७.२५ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४४४ दिवसांसाठी ७.३ टक्के, इंडियन बँक ४०० दिवसांसाठी ७.२५ टक्के, इंडियन ओव्हरसिस बँक ४४४ दिवसांसाठी ७.३ टक्के, पंजाब नॅशनल बँक ४०० दिवसांसाठी ७.२५ टक्के, ६६६ दिवसांसाठी पंजाब अँड सिंध बँक ७.३ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ४४४ दिवसांसाठी ७.२५ टक्के आणि यूनियन बँक ३३३ दिवसांसाठी ७.४ टक्के व्याज दर देत आहे.

विशेष मुदत ठेव योजना

बँक ऑफ इंडियाकडून विशेष मुदत ठेवी योजनाही घोषित केल्या आहेत. यामध्ये दोन कोटी पर्यंतच्या ठेवीवर ६६६ दिवसांसाठी सामान्य खातेदारांना ७.३० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.८० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.९५ टक्के इतका व्याज दर मिळेल.

आणखी वाचा >> Hindenburg Report : हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदाणी समूहाचे शेअर्स सात टक्क्यांनी कोसळले; आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचं ५३ हजार कोटींचं नुकसान

तर स्टेट बँक ऑफ इंडियाने “अमृत वृष्टी” या नावाने नवी मर्यादीत काळासाठीची मुदत ठेव योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारत आणि अनिवासी भारतीय खातेदारांसाठी अधिक व्याज दर देणाऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. ही योजना १५ जुलै पासून सुरू झाली आहे. प्रत्यक्ष शाखेत जाऊन आणि इंटरनेट बँकिंग किंवा योनो बँकिंग ॲपद्वारे या ठेवींचा लाभ घेता येऊ शकतो.