PNB ATM to GST rule Changes from 1 May 2023 : मे महिना सुरू झाला आहे. आज कामगार दिन आणि सिंधुदुर्गाचा स्थापना दिवसही आहे. १ मेच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. याशिवाय पंजाब नॅशनल बँकेने एटीएमचे नियम बदललेत. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी एकूण ४ नियमांत बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणते नियम बदलले आहेत.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर

व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर आजपासून १७१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. केंद्र सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आढावा घेतल्यानंतर एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलत असते. यापूर्वी एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली होती. नव्या कपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८५६.५० रुपयांवर गेली आहे.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

म्युच्युअल फंडांमध्ये आता केवायसी अनिवार्य

बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना केवायसी केलेल्या वॉटेलमधूनच पैसे घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांना केवळ केवायसी केलेल्या ई-वॉलेटमधून पैसे घेता येणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, जर तुमच्या वॉलेटचे KYC झालेले नसेल तर तुम्ही त्याद्वारे गुंतवणूक करू शकणार नाही. लक्षात ठेवा हा नियम १ मेपासून लागू झाला आहे.

जीएसटीचे नियम बदलतील

जीएसटीशी संबंधित एक प्रमुख नियम बदलला आहे. नवीन नियमानुसार, १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना त्यांच्या व्यवहारांची बिलं ७ दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) अपलोड करावी लागणार आहेत. सध्या हे करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

हेही वाचाः वयाच्या २३ व्या वर्षी शेअर बाजारातून कमावले १०० कोटी; १२ वी पास मुलगा झाला करोडपती, कोण आहे संकर्ष चंदा?

पंजाब नॅशनल बँक एटीएम शुल्क आकारणार

सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एटीएममधून व्यवहार करण्याच्या नियमात बदल केला आहे. खात्यात अपुऱ्या निधीमुळे तुमच्या एटीएममधील व्यवहार अयशस्वी झाल्यास PNB तुमच्याकडून १० रुपये आकारेल. एवढेच नाही तर या १० रुपयांवर स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जाणार आहे.

हेही वाचाः विप्रोची १२,००० कोटींची ‘बायबॅक’ योजना; भागधारकांकडून १९ टक्के अधिमूल्याने समभाग खरेदी