LPG Cylinder Price Increase : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मंगळवारी सकाळपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत वाढ झाली आहे. इंधन कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपन्यांनी यावेळी केवळ १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढवली आहे. १४ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल केलेला नाही. नव्या दरवाढीनंतर आता १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी १,७४० रुपये मोजावे लागणार आहेत. कालपर्यंत या सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपये इतकी होती. म्हणजेच या सिलिंडरच्या किंमतीत ४८.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

IOCL च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीव्यतिरिक्त इतर महानगरांमध्ये देखील नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईत १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १,६०५ रुपये इतकी होती. गेल्या महिन्यात या सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत १,६४४ रुपये झाली. मात्र, आज पुन्हा एकदा या सिलिंडरची किंमत वाढवण्यात आली असून आता या सिलिंडरसाठी मुंबईकरांना १६९२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४८.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

हे ही वाचा >> पायाभूत क्षेत्रांच्या वाढीला घरघर; साडेतीन वर्षात पहिल्यांदाच नकारात्मक; ऑगस्टमध्ये उणे १.८ टक्क्यांपर्यंत अधोगती

चेन्नई व कोलकात्यातही दरवाढ लागू

कोलकात्यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर ३० सप्टेंबरपर्यंत १,८०२ रुपयांमध्ये मिळत होता, जो आता १,८५० रुपयांचा झाला आहे. तर, चेन्नईत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,९०३ रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात चेन्नईत या सिलिंडरची किंमत १८५५ रुपये इतकी होती.

हे ही वाचा >> ‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!

सलग तिसरी मोठी दरवाढ

१९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत जुलै २०२४ पासून सातत्याने वाढवली जात आहे. एक जुलै रोजी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला या सिलिंडरची किंमत वाढवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ८.५० रुपयांची तर सप्टेंबर महिन्यात ३९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात ४८.५० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.