केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनेचा व्याजदर जाहीर केला. सरकारने केवळ मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेचा (SSY) व्याजदर ७.६० टक्क्यांवरून ८ टक्के केला. मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी SSY ही सर्वात लोकप्रिय छोटी बचत योजना आहे. SSY खाते मुलीच्या पालकांपैकी कोणीही किंवा कायदेशीर पालकांद्वारे चालवले जाऊ शकते. देशातील सर्व मुलींच्या आर्थिक सुरक्षेच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली. ही योजना १८ वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी आहे, पूर्वी ही मर्यादा फक्त १० वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी होती. तुम्हालाही तुमच्या मुलींना सुरक्षित भविष्य द्यायचे असेल, तर त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. या सरकारी योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

परिपक्वता (maturity) कालावधी

खात्याचा मॅच्युरिटी कालावधी तुम्ही ज्या वयात मुलीचे खाते उघडले आहे, त्यावर अवलंबून असतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ५० टक्के रक्कम काढता येते. आर्थिक गुंतवणूकदार कलम ८० सी मर्यादेअंतर्गत १.५ लाखांपर्यंत कर सवलत मिळवू शकतात.

meta 213 crores fine
‘मेटा’ला २१३ कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाकडून कठोर शेऱ्यांसह आदेश
finance minister Nirmala Sitharaman
बँकांची कर्ज परवडणारी हवीत – सीतारामन
urban unemployment percentage marathi news
शहरी बेरोजगारीचा टक्का सप्टेंबर तिमाहीअखेर ६.४ टक्क्यांवर, तिमाहीगणिक ०.२ टक्क्यांनी घसरण
sbi marathi news
स्टेट बँक वर्षभरात आणखी ५०० शाखा सुरू करणार! सर्वात मोठ्या बँकेचे शाखाविस्तारात २३ हजारांचे लक्ष्य
banks administrative work
बँकांनी प्रशासकीय चौकट भक्कम करावी – दास; अनिष्ट पद्धतींना आळा घालण्याचे गव्हर्नरांचे आवाहन
bank of baroda stock market latest marathi news
धास्तावलेल्या शेअर गुंतवणूकदारांना दिलासा; वर्षभरात २०-२५ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक बाजारात परतेल
Direct tax collection marathi news
प्रत्यक्ष कर संकलन उद्दिष्टापेक्षा अधिक होईल, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांचा आशावाद
Today’s Gold Silver Price 18 November 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील आजचा दर
income tax law, income tax, property, gifts,
भेटी करपात्र आहेत का?

हेही वाचाः ICICI-Videocon Fraud Case : सीबीआयची चंदा-दीपक कोचर यांच्यावर कडक कारवाई, पहिले आरोपपत्र दाखल

४१ लाखांचा निधी कसा तयार होणार?

मॅच्युरिटीच्या वेळी एखाद्याच्या पैशावर सुमारे ७.६ टक्के परतावा गृहीत धरून जर एखाद्याने १२ हप्त्यांमध्ये दरमहा १२,५०० रुपयांची गुंतवणूक केली, तर तुमची दरवर्षी गुंतवणूक १,५०,००० लाख होईल. सुकन्या समृद्धी खात्याचा परिपक्वता कालावधी १५ वर्षे आहे. जर तुम्ही १५ वर्षांसाठी प्रति वर्ष १,५०,००० लाख रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक २२.५० लाख रुपये होईल. या गुंतवणुकीवर ८ टक्के दराने एकूण १९.९८ लाख रुपयांचे व्याज मिळते. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण रक्कम ४२.४८ लाख रुपये होईल. म्हणजे १५ वर्षांनंतर ४२.४८ लाख रुपये मिळतील.

तुम्ही कुठे खाते उघडू शकता?

कोणताही गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस किंवा देशभरातील कोणत्याही बँकेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतो. त्यासाठी मुलीचा जन्म दाखला, ओळख आणि रहिवासी पुरावा द्यावा लागणार आहे.

हेही वाचाः सिम कार्डसाठी केवायसी पडताळणी लवकरच होणार डिजिटल