Sankarsh Chanda Success Story : जेव्हा कधी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया आणि डॉली खन्ना यांच्यासह अनेक बड्या गुंतवणूकदारांची नावे लोकांच्या समोर येतात. पण भारतात अनेक तरुण गुंतवणूकदारांनीसुद्धा शेअर बाजारातून लाखोंनी पैसा कमावला आहे. लोकांना कदाचित तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांबद्दल माहिती नसेल. आता या यादीत एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो कोट्यधीश झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबाद येथील संकर्ष चंदा (२४) यानं केवळ १७ वर्षांचा असताना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी संकर्षने शेअर मार्केटमधून १०० कोटी रुपये कमावले. खरं तर हे खूपच आश्चर्यचकित करणारे आहे, कारण बहुतेक गुंतवणूकदार आणि व्यापारी सुरुवातीला शेअर बाजारात पैसे गमावतात. संकर्षने शेअर बाजारातून करोडोंची कमाई करण्याचा हा चमत्कार कसा साध्य केला हे जाणून घेऊयात

२००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली

संकर्षने २०१६ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तो बेनेट युनिव्हर्सिटी (ग्रेटर नोएडा) मधून बीटेक कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करीत होता, परंतु शेअर बाजारातील आवडीमुळे त्याने अभ्यास सोडला. संकर्षने अवघ्या २००० रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. डीएनएच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत संकर्ष म्हणतो, “मी २ वर्षात शेअर बाजारात सुमारे १.५ लाख रुपये गुंतवले आणि २ वर्षांच्या कालावधीत माझ्या शेअर्सचे बाजार मूल्य १३ लाख रुपये झाले.”

हेही वाचाः विप्रोची १२,००० कोटींची ‘बायबॅक’ योजना; भागधारकांकडून १९ टक्के अधिमूल्याने समभाग खरेदी

गुंतवणुकीसाठी कंपनी सुरू केली

संकर्ष केवळ शेअर बाजारामध्येच गुंतवणूक करत नाही, तर तो Savart अर्थात Svobodha Infinity Investment Advisors Private Limited नावाच्या फिनटेक स्टार्टअपचा संस्थापक देखील आहे. त्याचे फिनटेक स्टार्टअप लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते. फिनटेक स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने २०१७ मध्ये ८ लाख रुपयांना शेअर्स विकले आणि तो स्टार्टअपद्वारे कमावलेले पैसे पुन्हा गुंतवत राहिला आणि भरपूर नफा कमावला. संकर्षने द वीकेंड लीडरला सांगितले की, “माझी एकूण संपत्ती आता १०० कोटी आहे.” हे माझ्या शेअर बाजारातील गुंतवणुकीव्यतिरिक्त माझ्या कंपनीच्या मूल्यांकनावर अवलंबून आहे. “फादर ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग” म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ बेंजामिन ग्रॅहम यांचा लेख वाचून वयाच्या १४ व्या वर्षी संकर्षला शेअर बाजारात आवड निर्माण झाली आणि आज तो कोट्यधीश बनला.

हेही वाचाः विश्लेषण : आरबीआयने अडूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे आता काय होणार?

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 crore earned from stock market at the 23 age 12th pass son became a millionaire who is sankarsh chanda vrd