(बीएसई कोड ५२३३१९)

संकेतस्थळ: http://www.balmerlawrie.com/
प्रवर्तक: बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, भारत सरकार

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
industrial production
औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित
Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

बाजारभाव: रु.२८६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ग्रीज, ल्युब्रिकंट्स, लॉजिस्टिक्स

भरणा झालेले भाग भांडवल: १७१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६१.८२
परदेशी गुंतवणूकदार ३.०७

बँक/म्युच्युअल फंड/ सरकार १.९३
इतर/ जनता ३३.१८

पुस्तकी मूल्य: रु. १०६
दर्शनी मूल्य: रु.१०/-
लाभांश: — %
प्रति समभाग उत्पन्न: १५.३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १९

हेही वाचा : ‘सेन्सेक्स’ची फेरमुसंडी; अमेरिकी ‘जीडीपी’ वाढीने १,२९२ अंशांची कमाई

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २६.८

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०६
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १३.४

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १५.६
बीटा : १.८

बाजार भांडवल: रु. ४९०१ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३२०/१२९
गुंतवणूक कालावधी : २४ महिने

बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड हा भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या सरकारी कंपनीची ही उपकंपनी आहे.

हेही वाचा : धातू भंगार पुनर्वापरातील राजपुताना इंडस्ट्रीजचा ३० जुलैपासून ‘आयपीओ’

बाल्मर लॉरी बहुविध व्यवसायात कार्यरत असून यात औद्योगिक पॅकेजिंग, वंगण, लेदर, रसायने, दळणवळण अर्थात लॉजिस्टिक सेवा, पायाभूत सुविधा, रिफायनरी आणि ऑइल फील्डसारख्या सेवांचा समावेश आहे. औद्योगिक पॅकेजिंगमध्ये बाल्मर लॉरी भारतातील आघाडीची कंपनी असून ती निरनिराळया आकाराच्या ड्रम्सपासून विविध उद्योग विभागांसाठी उच्च दर्जाची उत्पादने तयार करते. कंपनीचे हरियाणा, चेन्नई, चित्तूर, नवी मुंबई, सिल्वासा आणि वडोदरा येथे प्रकल्प आहेत. कंपनीचे ग्रीस आणि वंगण उत्पादन प्रकल्प कोलकाता, सिल्वासा आणि चेन्नई येथे आहेत. कंपनीची गोदाम आणि वितरण सुविधा सध्या कोलकाता आणि कोईम्बतूर येथे कार्यरत आहे. या व्यतिरिक्त, आंध्र प्रदेश येथील मेडटेक झोन लिमिटेडमधून ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधा, चालवा, व्यवस्थापित करा आणि देखभाल करा या तत्त्वावर एक गोदाम आणि वितरण सुविधा चालवली जात आहे. ज्यामध्ये कोल्ड स्टोरेजचा समावेश आहे. कंपनी एअर तिकीट आणि संबंधित सेवा (हॉटेल बुकिंग, फॉरेक्स, विमा, वाहतूक) इ. सेवा पुरवते. कंपनीच्या कोल्ड चेन सेवा हैदराबाद, राय (हरियाणा), पाताळगंगा (महाराष्ट्र) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे कार्यरत आहेत. कंपनीच्या एकूण महसुलापैकी जवळपास ८५ टक्के महसूल पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स आणि ग्रीस/ वंगण या उत्पादनातून आहे. कंपनीचा ‘बल्मेरोल’ हा ग्रीस/ वंगण उत्पादनासाठीचा प्रसिद्ध नाममुद्रा आहे.

बाल्मर लॉरीची उत्पादने संपूर्ण देशभरात उपलब्ध असून बहुतांशी सरकारी कंपन्या बाल्मर लॉरीच मोठे ग्राहक आहेत. कंपनीची काही उत्पादने चीन, केनिया, नेपाळ, श्रीलंका, न्यूझीलंड, कतार, कुवेत इत्यादी देशांमध्ये निर्यात केली जातात. आपल्या उत्पादनाच्या वाढत्या मागण्यासाठी कंपनीची आगामी तीन वर्षांत २३० कोटींची भांडवली खर्चाची योजना आहे. विविध क्षेत्रांतील विस्तारीकरणाच्या योजना राबवण्यासाठी कंपनीने सहयोगी कंपन्यात गुंतवणूक तसेच उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. यांत विशाखापट्टणम पोर्ट लॉजिस्टिक पार्क लिमिटेड (हा बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड आणि विशाखापट्टणम पोर्ट ऑथॉरिटी यांचा संयुक्त उपक्रम आहे), औद्योगिक पॅकेजिंग उत्पादनांसाठी वन-स्टॉप-शॉप म्हणून बाल्मर लॉरी (यूएई) एलएलसी तसेच बाल्मर लॉरी-व्हॅन लीर इ. कपन्यांचा समावेश होतो.

हेही वाचा : सोने हजार रुपयांनी स्वस्त

गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने २,३३९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा असून ही एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल. आजच कंपनीने पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होतील. हा निकाल अभ्यासून गुंतवणूक निर्णय घेता येईल. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

  • वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader