SBI Q4 Results : देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया(State Bank of India)ने नुकत्याच सरलेल्या चौथ्या तिमाहीत १६,६९४ कोटींचा करोत्तर नफा कमावला. पत गुणवत्तेत सुधारणा आणि निव्वळ व्याजापोटी उत्पन्नात वाढीमुळे बँकेला ही सशक्त कामगिरी करता आली. सरलेल्या तिमाहीत बहुतांश मापदंडांवर बँकेला चांगली कामगिरी करता आली आहे. वर्षागणिक तिमाही नफ्यात ८३ टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील जानेवारी-मार्च तिमाहीत, स्टेट बँकेने ९,११३.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. तर संपूर्ण आर्थिक वर्षात बँकेने ५०,२३२ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. त्यात वार्षिक आधारावर ५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये बँकेने ३१,६७५.९८ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता.
सरलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत, बँकेचे व्याज उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून ९२,९५१ कोटी रुपये झाले. तर २०२१-२२ च्या जानेवारी-मार्च कालावधीतील ७,२३७.४५ कोटी रुपयांच्या तुलनेत या तिमाहीत बुडीत कर्जे आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी तरतूद जवळपास निम्मी होऊन ३,३१५.७१ कोटींवर आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा