एलईडी दिवे तयार करणारी भारतातील आघाडीची कंपनी ‘आईकिओ लाइटिंग लिमिटेड’च्या समभागाने पदार्पणात गुंतवणूकदारांना ४२ टक्के परतावा दिला आहे. विद्यमान जून महिन्यात प्रत्येकी २८५ रुपयांनी सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांनी मिळविलेल्या कंपनीच्या समभागाची शुक्रवारी शेअर बाजारात नोंदणी होताच सकाळच्या व्यवहारात ३७.१९ टक्के अधिमूल्यासह त्याने ३९१ रुपयांच्या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली.

नंतरच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात तो ४२७.४० रुपयांपर्यंत झेपावला, तर त्याचा दिवसाचा तळही ३९१ रुपयांनजीक होता. दिवसअखेर समभाग वितरित किमतीच्या तब्बल ४१.६७ टक्क्य़ांनी उंचावत ४०३.७५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीतून ६०७ कोटी रुपयांचा निधी उभारला होता. त्यासाठी प्रत्येकी २७० ते २८५ किंमतपट्टा निश्चित केला होता.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर

हेही वाचाः सेन्सेक्स, निफ्टी दोन्ही निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर

‘आईकिओ लाइटिंग लिमिटेड’ प्रामुख्याने फिलिप्स इंडियासारखा नाममुद्रेला लाईट आणि सुटे भाग पुरविण्याचे कार्य करते. याशिवाय वाणिज्य उपयोगाचे शीतकपाटातील दिवे (रेफ्रिजरेशन लाईट), विद्युत दिव्यांशी संबंधित उपकरणे आणि प्रणाली जे मुख्यतः निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक उपयोगासाठी वापरली जातात. याचबरोबर फिलिप्स इंडिया, तनिष्क, ताज, हयात हे कंपनीचे मुख्य ग्राहक लाभार्थी आहेत.

हेही वाचाः Oracle Layoff: ओरॅकल कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं प्रकरण काय?

Story img Loader