Adani Green Energy company profit : अदाणी समूहाच्या ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये रॉकेटसारखा वेग पाहायला मिळतो आहे. याचे कारण म्हणजे कंपनीचे तिमाही निकाल आहे. ज्यामध्ये कंपनीने जबरदस्त नफा नोंदवला आहे. अदाणी ग्रीन एनर्जीने मार्च तिमाहीत चारपट नफा कमावला आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने ५०७ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा १२१ कोटी रुपये होता. जर महसुलाबद्दल बोलायचे झाल्यास एका वर्षापूर्वी मार्च तिमाहीत तो १,५८७ कोटी रुपये होता, जो वाढून २,९८८ कोटी रुपये झाला आहे, जे जवळजवळ दुप्पट आहे.

ग्रीन एनर्जी कंपनीचा महसूलही वाढला

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षातील ४८९ कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा ९७३ कोटी रुपये झाला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न एक वर्षापूर्वी ५,५४८ कोटी रुपयांवरून ८,६३३ कोटी रुपये झाले. अदाणी ग्रीन एनर्जीने कंपनीचे एमडी आणि सीईओ विनीत एस. जैन यांना कंपनीचे एमडी पद बहाल केले असून, ते ११ मे २०२३ पासून कार्यान्वित होणार आहे.

Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

हेही वाचाः पुढील ५ वर्षांत जवळपास १.४० कोटी नोकऱ्या धोक्यात; भारतावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर

अक्षय ऊर्जा क्षमतेत वाढ

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ऊर्जा विक्री वार्षिक आधारावर ५८ टक्क्यांनी वाढून १४,८८० दशलक्ष युनिट्स झाली आहे. अदाणी ग्रीनने वित्तीय वर्ष २३ मध्ये २,६७६ मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता त्यांच्या परिचालन ताफ्यात समाविष्ट केली आहे. ज्यामध्ये राजस्थानमधील २,१४० मेगावाट सौर-पवन संकरित प्रकल्प, मध्य प्रदेशातील ३२५ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प आणि राजस्थानमधील २१२ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. अदाणी ग्रीनने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये SECI बरोबर ४५० मेगावाट पवन प्रकल्प आणि ६५० मेगावाटच्या सौर प्रकल्पांसाठी PPA वर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे प्रकल्पाची पाइपलाइन आणखी मजबूत होईल.

हेही वाचाः आतापर्यंतचे ऐतिहासिक जीएसटी संकलन; एप्रिलमध्ये १.८७ लाख कोटी रुपये जमा

अदाणी ग्रीनचे शेअर्स वाढू शकतात

चांगल्या निकालानंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी शेअर बाजार उघडतील. तसे शुक्रवारी अदाणी ग्रीनच्या शेअर्समध्ये ३.६७ टक्क्यांची वाढ झाली आणि कंपनीचा शेअर ९५०.६० रुपयांवर बंद झाला. २८ एप्रिल रोजी कंपनीचा शेअर ४३९.३५ रुपयांसह ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ११६.३६ टक्क्यांची वाढ झाली आहे.